Indian Baby Name : बाळाचे नाव शास्त्रानुसार युनिक ठेवायचे आहे? 'ही' यादी पहा

सध्या जोडीदारांचे दोन नाव एकत्र करुन बाळाचे नाव ठेवले जाते.
Indian Baby Name
Indian Baby NameSaam Tv

Indian Baby Name : जगभरात अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या बाळाचे नाव हे युनिक पण शास्त्रानुसार ठेवले आहे. सध्या जोडीदारांचे दोन नाव एकत्र करुन बाळाचे नाव ठेवले जाते. परंतु, काही वेळेस नाव हे त्याच्या राशीवरुन ठेवले जात नाही. मग पुढे जाऊन बाळाला अधिक त्रास सहन करावा लागतो असे शास्त्रांचे मत आहे.

नुकत्याच सोनम कपूरने आपल्या बाळाचे (Baby) नामकरण केले. त्यात तिने तिच्या मुलांचे नाव वायू असे ठेवले. ज्याचा हिंदू शास्त्रात अनेक वेळा उल्लेख केला आहे. वायूचे वर्णन हे हनुमान, भीम आणि माधवांचे पिता आणि पराक्रमी वाऱ्याची देवता म्हणून केले आहे. वायु हा हिंदू धर्मग्रंथातील पाच घटकांपैकी एक आहे. तो श्वासोच्छ्वासाचा देव, हनुमान, भीम आणि माधव यांचा आध्यात्मिक पिता आणि वाऱ्याचा अविश्वसनीय शक्तिशाली स्वामी आहे.

Indian Baby Name
Child Care Tips : मुलांच्या आहारात या लाल रंगाच्या पदार्थांचा समावेश करा, अन्यथा होईल डोळ्यांवर दूष्परिणाम

जर तुमच्या घरी (Home) नवीन पाहुणा आला असेल किंवा येणार असेल तर तुम्ही अशाच काही पौराणिक नावांचाही विचार करू शकता. ती नावे काय असू शकतात, आम्ही तुमच्यासाठी एक यादी आणली आहे आणि यामधून तुम्ही तुमच्या मुलाचे नाव निवडू शकता.

Indian Baby Name
Child Care : तुमच्या बाळाची हाडे कमजोर आहेत? 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा, दूडूदूडू धावू लागतील !

१. वायु -

पवन, वायुचा समानार्थी शब्द अगदी सामान्य आहे, याचा अर्थ आकाशात उंच भरारी घेणारा.

२. अक्षर -

अक्षर हे नाव जुने जरी वाटत असले तरी शास्त्रामध्ये याला अधिक महती आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचावरुन हे नाव तयार केले गेले आहे. हा देवांचा गुरू मानला जातो. अक्षराचा अर्थ वर्णमाला असाही होतो.

३. अनघ -

अनघ म्हणजे शुद्ध, निर्दोष. जर तुम्हाला मुलगी असेल तर तिचे नाव अनघा देखील आपण ठेवू शकतो. भगवान विष्णूचे १४६ वे नाव हे अनघा आहे.

४. अनुज -

ऋग्वेदात अनुज नावाचा उल्लेख आहे. याचा अर्थ चमकणे आणि बहुतेकांपेक्षा वेगळे आहे.

५. अपराजित-

अपराजित म्हणजे ज्याला पराभूत करता येत नाही. भगवान श्रीकृष्णाच्या पुत्राचे नावही अपराजित होते.

Indian Baby Name
Game of Names : तुमच्या बाळाचे नाव देखील 'हे' आहे? जाणून घ्या, नावांच्या या गंमती-जमती

६. अच्युत -

हे एक पौराणिक नाव देखील आहे. अच्युत नावाचा अर्थ अविनाशी, अमर, कधीही न मरणारा असा आहे. भगवान विष्णूंना अच्युत असेही म्हणतात.

७. जान्हव-

जान्हव हा हिंदू ऋषी होता ज्यांच्या चरणी गंगा राहत होती. तुम्ही तुमच्या मुलीचे नाव जान्हवी ठेवू शकता.

८. जीवा -

जीव हे देखील एक चांगले आणि वेगळे नाव आहे. याचा अर्थ जिवंत आणि निरोगी.

९. शनाय-

संस्कृतमध्ये शनाय म्हणजे शनिदेवाची शक्ती. मुलाचे नाव शनाय आणि मुलीचे नाव शनाया ठेवता येईल.

१०. दक्ष -

जर तुम्ही मुलासाठी वेगळे नाव शोधत असाल तर तुम्हाला दक्ष हे नाव आवडेल. दक्ष नावाचा अर्थ "दक्षाचा स्वामी आणि राजा" असा आहे. भगवान शिवाला दक्ष म्हणूनही ओळखले जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com