Indian Food history: तुम्हाला माहित आहे का, 'हे' पदार्थ मुळचे भारतीय नाहीत

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये अनेक पदार्थ आपण ब्रिटिश साम्राज्यातून खाण्यास सुरुवात केली, काही मुघलांकडून तर काही फ्रेंच-डच-तुर्कांकडून शिकल्या.
Indian Food history: तुम्हाला माहित आहे का, 'हे' पदार्थ मुळचे भारतीय नाहीत
Indian Food history: तुम्हाला माहित आहे का, 'हे' पदार्थ मुळचे भारतीय नाहीत

भारतीय पदार्थ इतके वैविध्यपूर्ण आहेत की ते कुठून आले हे सांगणे अत्यंत कठीण आहे. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये अनेक पदार्थ आपण ब्रिटिश साम्राज्यातून खाण्यास सुरुवात केली, काही मुघलांकडून तर काही फ्रेंच-डच-तुर्कांकडून शिकल्या. पण एक गोष्ट निश्चित आहे की भारतीय अन्नपदार्थांची मुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात आपल्याला पाहायला मिळतात. गुलाबजाम हा असा पदार्थ आहे जो प्रत्येक भारतीयाच्या आवडीचा पदार्थ आहे. पण तुम्हाला माहित आहे का, गुलाबजाम, समोसा कुठून आले, सकाळी उठल्या उठल्या लागतो तो चहा कुठून आला, इतकेच नव्हे तर डाळभात कुठून आला हे माहिती आहे का तुम्हाला. नाही ना,

याचं कारण म्हणजे हे पदार्थ मुळचे भारतातील नाहीत, पण आपण अनेक वर्षांपासून हे खात आहोत, या पदार्थांशिवाय आपला रोजचा आहार अपुर्ण आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहोत जे मुळचे भारतीय नाहीत, पण आजपर्यंत ते आपण भारतीय समजून खात होतो.

1. समोसा

आपल्या खिशात कमी पैसे असतील आणि मित्र पार्टी मागत असतील तर आपल्याकडे पहिला पर्याय असतो तो समोसा. समोसा हा भारतीयांच्या खानपानात इतका आवडीचा झाला आहे की ते समोसाला भारतीयच मानतात. पण समोसा भारतात आला तो, 13 व्या आणि 14 व्या शतकाच्या दरम्यान. भारतात मध्य पूर्वेच्या व्यापाऱ्यांनी समोसा भारतात आणला. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अनेक शतकांनंतरही समोसा भारतीयांच्या आवडीचा पदार्थ आहे. हैदराबादमध्ये लोकप्रिय असलेले मांसाचे समोसे आणि दक्षिण भारतातील भाज्यांचे समोसे ही याची काही उत्तम उदाहरणे आहेत.

2. राजमा, मेक्सिको

राजमा आज आमच्या आणि तुमच्या स्वयंपाकघरचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. दिल्लीच्या रस्त्यावर आजही शेकडो लोक राजमाचे पदार्थ आवडीने खाताना तुम्हाला दिसतील. पण राजमाही भारतीय नाही बरं का. मेक्सिको आणि ग्वाटेमाला येथून राजमा भारतात आला. आजही मेक्सिकन पाककृतीमध्ये राजमाचा वापर केला जतो. याला किडनी बीन्स म्हणूनही ओळखले जाते. राजमा बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो आरोग्यासाठी अत्यंंत फादेशीर आहे. राजमा संपूर्ण शरीराचे पोषण करण्यास सक्षम आहे.

3. जिलेबी, इराण

जिलेबी, नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटले ना. मिठाईच्या दुकानातून गरमागरम जिलेबीचा सुगंध आला की आपोआप आपले पाय तिकडे वळतात. पण ही गोड आणि रसाळ जिलेबीही भारतातली नाही.

जिलेबी प्रत्यक्षात मध्य पूर्व मधून भारतात आली आणि भारतीय अन्नपदार्थांमधला एक अविभाज्य घटक बनली आहे. सुरुवातीला जिलेबीला झलबीया (अरबी) किंवा झालिबिया (फारसी) असे म्हणत. पर्शियन आक्रमकांनी जिलेबी भारतात आणली. आज भारतात जिलेबीची विविध प्रकार लोकप्रिय आहेत. उत्तर भारतात पातळ जलेबी प्रचलित आहेत. तर दक्षिण भारतात लोकांना थोडी चरबीयुक्त जलेबी खाणे आवडते.

4. गुलाबजाम, इराण

आपण कितीही मिठाई खाल्ल्या असल्या तरी, गुलाबजाम हा पदार्थच वेगळा आहे. रुसलेल्या मनवायचे असो, वा भारतीय सण उत्सव असो गुलाबजाम ठरलेलाच असतो. हेच कारण आहे की आपण त्याला भारतीय मानतो. पण भूमध्य आणि पर्शियनांनी गुलाबजाम भारतात आणला. आज त्याच्या स्वरुपात कितीही बदल झाले असले तरी. त्याची गोडीत काहीच फरक पडला नाही. विशेष म्हणजे भारतात गुलाबजामची विक्री कायम वाढतच राहिली आहे.

5. डाळभात नेपाळ

फक्त कल्पना करा की तुम्हाल प्रचंड भूक लागली आहे. पोट भुकेने व्याकूळ झाले आहे. पण तुम्हाला पोळी करता येत नाही, मग तुम्हाला पहिल्यांदा आठवतो तो, डाळभात. डाळभात झटकन तयार होणारा पदार्थ आहे. भारतात डाळभाताला प्रादेशिक भाषांमध्ये वेगवेगळी नावे आहेत.

डाळबात हा सर्वात सोपा पदार्थ आहे. पण तोही भारतीय नाही बरं का. डाळभात आपल्या शेजारचा देश नेपाळचा आहे. नेपाळमधून डाळभात भारतात प्रचलित झाला. मूग, मसूर, हरभरा, यांसारख्या अनेक डाळी आणि तांदळापासून बनवलेला डाळभात आज भारतीयांच्या ताटातील अविभाज्य पदार्थ आहे.

6. नान, मध्य पूर्व

भारतीय हॉटेल किंवा बाहेर कुठे जेवायला गेलो तर, आपण पोळी ऐवजी रोटी किंवा नान ला पंसती देतो. नान हा आपल्या भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील लोकांच्या खानपानातील महत्त्वाचा पदार्थ बनला आहे. भारतीयांसाठी नान म्हणजे भारतीय पदार्थ असेच समज आहे. पण नान हा भारतीयांना मुघलांकडून मिळाले आहे. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये नानचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची चवही तितकीच अप्रतिम असते.

7. बटाटा, पेरू

बटाटा हा देखील भारतीयांच्या खाद्यपदार्थांमधील अविभाज्य घटक आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा भारतीय बाजारात बटाटा वर्षभर उपलब्ध असतो. बटाट्याशिवाय भारतीयांचे जेवण अपुर्ण आहे. पण जर कोणी तुम्हाला असे सांगितल की, बटाटा भारतीय नाही तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण हे सत्य आहे. बटाटा भारतात पेरु आणि बोलिव्हिया देशातून आला. पण बटाटा पीक आज भारतात प्रामुख्याने घेतले जाते.

8. चहा, चीन

सकाळी उठल्या उठल्या आपल्याला चहा मिळाला नाही तर डोकं दुखू लागतं. चहा देखील भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य पदार्थ झाला आहे. चहाशिवाय भारतीयांची सकाळ होऊच शकत नाही. चहाशिवाय सर्व काही अपूर्ण वाटते.

चहाची ही सवय भारतात वर्षानुवर्षे आहे. परंतु यासह, सत्य हे देखील आहे की भारतीय नाही. हा चीनचा शोध असल्याचे म्हटले जाते. बरं, शोध कुठेही असला तरी सत्य हे आहे की आज संपूर्ण जग भारतीय चहाच्या आहारी गेले आहे. येथे चहाच्या 50 पेक्षा जास्त जाती आणि डझनभर पाककृती आहेत.

9. चिकन टिक्का मसाला, स्कॉटलंड

क्रीमयुक्त ऑरेंज करी, सॉसमध्ये बुडवलेले रसाळ चिकन. म्हणजे चिकन टिक्का मसाला. जेवणाची चव दुप्पट करते. पण चिकन टिक्का मसाला मुळचा भारतीय नाही. कारण त्याची मुळे स्कॉटलंडशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. याला ब्रिटनची राष्ट्रीय डिश असेही म्हटले जाते. बरं, ते कुठेही असो. ज्यांना ते आवडते त्यांच्यासाठी हे अमृतापेक्षा कमी नाही.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com