Indian Railways Update VaishnoDevi : रेल्वेची नवी सुविधा ! आता वैष्णो देवीच्या भक्तांचा प्रवास होणार अधिक सुखकर...

Vaishno Devi Train : वैष्णो देवीला जाणाऱ्या भक्तांसाठी भारतीय रेल्वेकडून मोठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
Indian Railways Update VaishnoDevi
Indian Railways Update VaishnoDeviSaam Tv

Indian Railways Update : वैष्णो देवीला जाणाऱ्या भक्तांसाठी भारतीय रेल्वेकडून मोठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. जर तुम्ही देखील या वर्षी वैष्णो देवीच्या दर्शनास जाण्याचे ठरवत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

आता तुम्हाला वैष्णो देवीला कसे जायचे या गोष्टीची चिंता करण्याची आवश्यकता नाही. भारतीय रेल्वेकडून वेळो-वेळी प्रवाशांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात असतात. काल 26 मे रोजी रेल्वेकडून (Railway) आपल्या प्रवाशांसाठी विशेष घोषणा करण्यात आली आहे. काय आहे हा रेल्वेचा विशेष निर्णय जाणून घेऊया

Indian Railways Update VaishnoDevi
Camping Travel Tips : कॅम्पिंगला जाण्याचा प्लान करताय ? ट्रेनचा प्रवास ठरेल बेस्ट ! भारतातील या 5 अनएक्प्लोर्ड ठिकाणांना भेट द्या

1. कशी असेल रेल्वेची सुविधा

भारतीय (Indian) रेल्वेने वाराणसी ते जम्मूतवी येथील प्रवाशांसाठी एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 04662/04661 ही ट्रेन आज 26 मे पासून सुरू होणार असून, यामुळे वैष्णोदेवीला जाणाऱ्या भक्तांचा प्रवास (Travel) अधिक सुखकर होणार आहे.

दिनांक 26 मे 2023 पासून गाडी क्रमांक 04662 जम्मू तवीवरून रात्री 11.20 ला सुटून 27 मे ला रात्री 10.55 ला वाराणसी कॅन्ट स्टेशनवर पोहोचणार असल्याची माहिती रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय वैष्णो देवीवरून परतण्यासाठी गाडी क्रमांक 04661 ही ट्रेन वाराणसी कॅन्टवरुन सकाळी 7.30 ला सुटून होऊन दुसऱ्या दिवशी 9.10 ला जम्मू तवीला पोहाचणार आहे.

Indian Railways Update VaishnoDevi
Indian Railway New Service : रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर होणार ! पैसे न देता बुक करा तिकीट, कसे ते जाणून घ्या

2. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे घेतला निर्णय

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या भाविकांच्या संख्येला विचारात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यासाठी रेल्वेकडून एसी, स्लीपर आणि जनरल अशा प्रकारचे कोचेस उपलब्ध असणार आहेत.

3. 28 ते 30 मे पर्यंत ही सेवा उपलब्ध नसेल.

फिरोजपूर डिवीजनमध्ये सुरु असलेल्या नॉन इंटर लॉकिंगच्या कामामुळे 28 ते 30 मे पर्यंत ही ट्रेन वाराणसी कॅन्टपर्यंत जाणार नसून पठानकोटवरच थांबवली जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जम्मूतवीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना दुसऱ्या गाड्यांचा वापर करावा लागणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com