Instagram Hacking Scam : तुमची एक चूक अन् इंस्टाग्राम हॅक ! कसे प्रोटेक्ट कराल तुमच्या अकाउंटला, जाणून घ्या प्रोसेस स्टेप-बाय-स्टेप

Two-Factor Authentication : सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात नवनवीन अॅप्स येत असतातं ज्यातून आपले मनोरंजन होतं असते.
Instagram Hacking Scam
Instagram Hacking ScamSaam Tv

Instagram Account : रिल्ससाठी फेमस असलेलं व असंख्य तरुण मंडळीचं आवडतं अॅप इंस्टाग्राम. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात नवनवीन अॅप्स येत असतातं ज्यातून आपले मनोरंजन होतं असते.

काळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगदी तासंतास यावर आपण आपला वेळ वाया घालवत असतो. मग ते रिल्स बघणं असो वा रिल्स बनवणं पण या ना त्या कारणाने आज लोकं इन्स्टाग्राम वापरतात. परंतु हे इन्स्टाग्राम जेवढं मनोरंजक आहे तितकच धोकादायक ही आहे.

Instagram Hacking Scam
Instagram New Reel Feature : आता इंस्टाग्रामवर रिल्स बनवणे झाले आणखीन मजेशीर, रील्स करताना वापरता येणार हे फीचर

सायबर क्राइमच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना फेसबूक, इन्स्टाग्राम सारखी सोशल मीडिया प्रसाधने सायबर गुन्हेगारांसाठी खुले मैदान ठरतात. आजकाल 'Instagram Scam'च नवं संकट सोशल मीडिया यूझर्सवर घोंगावताना दिसतयं. हा एक फिशिंग स्कॅम असून स्कॅमर तुमच्या न कळत तुमचे अकाऊंट हॅक करतो आणि तुम्हाला अंदाज देखील येत नाही की तुमची माहिती स्कॅमरपर्यंत पोहोचली आहे.

1. इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंट हॅक (Hack) झाल्यावर काय घडते?

हॅकर तुम्हाला एखाद्या गोष्टीची लालसा दाखवणारी लिंक पाठवतात ज्यावर क्लिक केल्यावर तुम्ही पुन्हा इन्स्टाग्राम लॉग इनवर रिडायरेकट केले दाते. तिथे तुम्हाला पुन्हा लॉग इन करायला सांगितले जाते. आणि जसे तुम्ही पुन्हा लॉग इन करता तशी तुमची इन्स्टाग्राम आयडी हॅकरकडे जाते.

Instagram Hacking Scam
WhatsApp Digi locker : चलन कट होण्याचे टेन्शन नॉट ! Driving License, RC सतत सोबत ठेवण्याची गरज नाही, WhatsApp च्या एका क्लिकवरुन होईल काम...

2. इन्स्टग्राम हॅकपासून कसे वाचाल ?

1. जर तुम्हाला एखादा असा मॅसेज आला असेल ज्यामध्ये आपल्याला ऑफरसारखे काही दिले असेल तर अशा मॅसेजकडे दुर्लक्ष करावे. कारण, अशा प्रकारचे मॅसेज इन्स्टाग्राम क्रेडेंशियल्स चोरतात.

2. आपल्या अकाऊंट वर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनला इनॅबल करा. यामुळे आपले अकाऊंट सुरक्षित राहिल. जर कोणी तुमचे अकाऊंट हॅक जरी करत असले तरी त्याला लॉग इन करताना अजून एका ऑथेंटिकेशनची गरज पडेल. म्हणून टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन अत्यंत महत्त्वाचे ठरते.

Instagram Hacking Scam
Why Saptashrungi is half Shaktipeeth : सप्तशृंगी देवीचे मंदिर अर्धवट अवस्थेत का आहे?

3. जर एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला मॅसेज करुन तुमची माहिती काढण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपली वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळख्या व्यक्तीला देऊ नका.

4.अनेक वेळा हॅकर्स मोठ्या ब्रॅडन्सच्या नावांचा वापर करून आपली माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा वेळी समोरच्या व्यक्तीची नीट तपासणी करणे आवश्यक आहे.

5. आपल्या फोनमध्ये एन्टी व्हायरस प्रोग्राम असावा. तो फोनमध्ये मालवेअरला प्रवेश करण्यापासून रोखतो आणि स्कॅम पासून तुम्हाला दूर ठेवतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com