सतत इन्स्टाग्राम रील्स पाहत असाल तर सावधान; तरुणांमध्ये वाढतोय 'या' आजाराचा धोका

इन्स्टाग्राम (Instagram) रील्स पाहणे आरोग्याला धोकादायक असून यामुळे मेंदूचे आजार बळावू लागले आहेत.
Instagram
Instagram saam tv

सिद्धेश म्हात्रे

Instagram News : लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच हातात हल्ली तासोंतास दिसणारी वस्तू म्हणजे स्मार्ट फोन. आजूबाजूला घडणारी, आवश्यक असणारी सर्व माहिती एका क्लिकवर मिळत असल्याने स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात आता सोशल मीडिया आणि त्यावरील रील्समुळे मनोरंजनाचे साधन म्हणून देखील आता स्मार्टफोनचा वापर अतीप्रमाणात वाढला आहे. मात्र सतत इन्स्टाग्राम (Instagram) रील्स पाहणे आरोग्याला धोकादायक असून यामुळे मेंदूचे आजार बळावू लागले आहेत.

Instagram
Home Remedy : टूथपेस्टने फक्त दातच नाही तर घरातील या वस्तू देखील चमकतील, 'हे' उपाय करुन पहा

मुख्यत स्मार्ट फोनचा वापर अधिक करत असल्याने तरुणांमध्ये ब्रेन फॉग अर्थात मानसिक थकवा येण्याचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच चिडचिडेपणा, एकटे राहण्याची सवय, भूक मंदावणे या समस्या भेडसावू लागल्या आहेत.

कोरोना काळात ऑनलाईन कार्यपद्धतीचे महत्व वाढले. शाळा, महाविद्यालयेसुद्धा ऑनलाईनच सुरू होती. त्यामुळे अनेक मुलांना मोबाइलचे व्यसन जडले असून विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आवडीचे व्हिडिओ, रील्स रात्री उशिरापर्यंत जागून पाहिले जातात. परिणामी मेंदूला थकवा जाणवू लागल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

Instagram
Weak Heart Symptoms : तुम्हाला देखील 'ही' लक्षणे जाणवताय ? येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

सध्या इन्स्टाग्राम रील्सचा ट्रेंड सगळीकडे झपाट्याने वाढत चालला आहे. इन्स्टाग्राम रील्स हा आजकाल कमाईचा नवीन मार्ग बनत आहे. त्यामुळे अनेक तरुण-तरुणींचा कल हा इन्स्टाग्राम रील्सकडे वळला आहे. त्यामुळे अनेक तरुणांचा ओढा इन्टाग्राम रील्सकडे वळला आहे. त्यामुळे तरुणांमध्ये इन्स्टाग्राम रील्सची क्रेझ वाढली आहे. केवळ १५ ते ३० सेकंदाचे असणारे हे रील्स तरुणांना मात्र दोन-दोन तास मोबाईलमध्ये गुंतून ठेवतात. याला वेळीच आवर घातला नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील हे मात्र नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com