Microsoft Designing Tool : तुमच्या आवडीचे फोटो झटपट करा एडिट; मायक्रोसॉफ्टचं भन्नाट डिझायनिंग टूल

Designing Tool : जर तुम्ही ग्राफिक्सशी संबंधित कोणतेही काम करत असाल तर तुम्ही कॅनव्हा वापरला असेल.
Microsoft Designing Tool
Microsoft Designing ToolSaam Tv

Microsoft Tool : जर तुम्ही ग्राफिक्सशी संबंधित कोणतेही काम करत असाल तर तुम्ही कॅनव्हा वापरला असेल. हे एक ग्राफिक डिझायनर साधन आहे जे तुम्ही वेबसाइटद्वारे प्रवेश करू शकता. यामध्ये, वापरकर्ता वाढदिवसासाठी पोस्टकार्ड, लग्नासाठी विशेष कार्ड, पोस्टर, बॅनर इत्यादी तयार करू शकतो.

Canva ची एक सशुल्क आवृत्ती देखील आहे, ज्यामध्ये काही इतर प्रीमियम फीचर्स (Features) उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने कोणताही प्रकल्प तयार करणे सोपे होते. कॅनव्हाशी स्पर्धा करण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट (Microsoft) काही काळापासून त्याच्या एआय समर्थित डिझायनर टूलवर काम करत आहे.

Microsoft Designing Tool
Aadhar Tool : UIDAI ने लाँच केले 'आधार मित्र' AI टूल, हे ChatGPT पेक्षा चांगले?

आता कंपनीने लोकांसाठी त्याचे पूर्वावलोकन जारी केले आहे. तुम्ही आता ते वापरू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मायक्रोसॉफ्ट अकाऊंटने लॉग इन करावे लागेल.

कॅनव्हा व्यतिरिक्त हे सर्व मायक्रोसॉफ्टच्या टूलमध्ये उपलब्ध असेल -

मायक्रोसॉफ्टच्या नवीन डिझायनर टूलमध्ये (Tool) AI सपोर्ट उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने कोणतेही टेम्प्लेट तयार करणे खूप सोपे होते. कॅनव्हा वर टेम्प्लेट तयार करण्यासाठी मॅन्युअल वर्क आवश्यक आहे, मायक्रोसॉफ्टच्या डिझायनर टूल्सच्या बाबतीत असे होत नाही. येथे तुम्हाला तुमची मागणी शोध बॉक्समध्ये टाकायची आहे आणि काही सेकंदातच निकाल तुमच्यासमोर येईल.

Microsoft Designing Tool
Technology News : मायक्रोसॉफ्टने लाँच केले 365 Copilot, या AI फीचरमुळे तुमचे काम होईल सोपे, जाणून घ्या कसा होणार फायदा

मायक्रोसॉफ्टचे डिझायनर टूल अगदी कॅनव्हासारखे आहे. यामध्ये कंपनीने DALL-E2 मॉडेलचा वापर केला आहे. यामध्ये तुम्ही AI च्या मदतीने कोणत्याही टेम्प्लेटसाठी इमेज निवडू शकता. यासाठी तुम्हाला फक्त सर्च बॉक्समध्ये कमांड टाकावी लागेल. लाइक- लग्नाची कार्डे जी पिवळ्या डिझाइनमध्ये आहेत.

याप्रमाणे वापरू शकता -

  • प्रथम ब्राउझरवर जा आणि मायक्रोसॉफ्ट डिझाइनर टाइप करा.

  • आता पहिली लिंक उघडा आणि मायक्रोसॉफ्ट अकाउंट लॉग इन करा

  • लॉग इन केल्यानंतर तुम्ही टेम्पलेट डिझाइन करू शकता.

Microsoft Designing Tool
Puneri Patya | पुणेरी पाट्या कोणी सुरू केल्या? पाहूयात या मागची कहाणी

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com