आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२२: आपल्या कुटुंबासोबत अशाप्रकारे करा योगा, होतील अनेक फायदे

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो.
International Yoga Day 2022, Yoga benefit, yoga with family, yoga benefits
International Yoga Day 2022, Yoga benefit, yoga with family, yoga benefitsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. आपले आरोग्य सुधारण्यासाठी योगासने महत्त्वाचे आहे. प्रत्येक योगासन वेगवेगळ्या पध्दतीने कार्य करते व त्याच्या आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. (International Yoga Day 2022)

हे देखील पहा-

आपण आपल्या कुटुंबासोबत वेळ केव्हा घालवतो? एकतर रात्रीच्या जेवणाच्या वेळी किंवा घरात काही समारंभ असेल त्यावेळी आपण आपल्या कुटुंबाला वेळ देतो. आजच्या काळात प्रत्येकासाठी वेळेचा अभाव ही समस्या बनत चालली आहे. त्यामुळे आपण आपल्या आरोग्यासोबत कौटुंबिक संबंध सुदृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवणे अधिक गरजेचे आहे. आपल्याला मुलांसोबत वेळ (Time) घालवण्यासाठी आपण त्याच्यासोबत योगा करायला हवा. योग करण्याचे अनेक फायदे (Benefits) आहेत. आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत योगा कसा करायचा त्याचे आपल्या नात्यावर कसे परिणाम होतील हे जाणून घ्या. (International yoga day 2022)

कुटुंबातील सदस्यासोबत योगा केल्याने फायदा होईल

१. आपल्या दिवसाची सुरुवात ही आपल्या कुटुंबासोबत योगाने करा. त्यामुळे आपले त्यांच्या सोबतचे संबंध अधिक चांगले होतील. आपल्या एकमेकांच्या भावना आणि सवयी समजून घेण्यास मदत होईल.

२. आपल्या कुटुंबात प्रत्येक वयोगटातील माणसे असतात त्यांच्या सोबत योगा करण्यात वेळ घालवला तर आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन मिळेल. कोणती योगासने करायची ते ठरवा.

International Yoga Day 2022, Yoga benefit, yoga with family, yoga benefits
आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२२: जाणून घ्या महत्त्व, इतिहास व थीम

३. योगासने करताना एकमेकांचा आधार घ्या. त्यामुळे मन एकाग्र करण्याची सवय लागेल. श्वासनासंबंधीचे इतर प्रश्न देखील सुटतील. तसेच आपल्या कुटुंबाला आपल्या समस्या स्वत:हून सांगण्याचा प्रयत्न करा. त्यावर मिळणारे उत्तर शांतपणे ऐकून घ्या.

४. आपल्या कुटुंबासोबत बसून योगासने केल्याने दिवसाची सुरुवात ही प्रसन्न होईल. आपली चिडचिड, छातीत सतत जळजळणे व सकाळी थकवा जाणवणार नाही. आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल.

५. सकाळी सकाळी योगा केल्याने आपल्यासोबत मुलांना देखील व्यायाम करण्याची सवय लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतात. त्यासाठी आपण दररोज योगा करायला हवा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com