International Youth Day 2022 : आंतरराष्ट्रीय युवा दिवसाची सुरुवात कधी झाली ? या दिवसाची सुरुवात कोणी केली ? जाणून घ्या

आंतराष्ट्रीय युवा दिवस का साजरा केला जातो ?
International Youth Day 2022
International Youth Day 2022Saam Tv

International Youth Day 2022 : देशाच्या विकासासाठी व देश घडवण्यासाठी युवा पिढीचे मोठे योगदान आहे. यासाठी युवा पिढीला देशातील सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीविषयी माहिती असणे अधिक गरजेचे आहे.

हे देखील पहा -

युवा पिढीचा देशासाठी आणि जगाच्या विकासासाठी विशेष महत्त्वाचे योगदान असायला हवे. यासाठी तरुणांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधले जाऊ शकतात. ज्यामुळे आपल्याला त्या गोष्टींवर आवाज उठवता येईल व विकासासाठी काम करता येईल या उद्देशाने हा दिवस दरवर्षी १२ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. युवा दिन हा जागतिक स्तरावर तरुणांचा आवाज, कृती व अर्थपूर्ण उपक्रम ओळखण्याची संधी आहे. पण हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला हे माहिती आहे का? आंतरराष्ट्रीय युवा दिन कसा साजरा केला जातो? या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय युवा दिनाचा इतिहास, उद्देश, महत्त्व आणि थीम जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय युवा दिवसाची सुरुवात कधी झाली ?

आंतरराष्ट्रीय युवा दिन पहिल्यांदा १२ ऑगस्ट २००० रोजी साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्र संघाने १७ डिसेंबर १९९९ रोजी घेतला होता. त्या दिवसांपासून १२ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, हा दिवस साजरा करण्याची सूचना १९९८ मध्ये झालेल्या जागतिक परिषदेत करण्यात आली होती. तरुणांनी अधिक जबाबदार व्हावे यासाठी जागतिक परिषदेत एक दिवस युवकांसाठी समर्पित करावा अशी सूचना केली होती, त्यानंतर १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ही सुचना स्वीकारली आणि १२ ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला. संयुक्त राष्ट्रांनी १९८५ ला आंतरराष्ट्रीय युवा वर्ष घोषित केले होते.

International Youth Day 2022
Butterfly Forest In India: फुलपाखरु छान किती दिसते ! भारतातल्या या फुलपाखराच्या जंगलाविषयी माहिती आहे का ?

आंतराष्ट्रीय युवा दिवस का साजरा केला जातो ?

युवा (Youth) दिन साजरा करण्याचे कारण काय? हा प्रश्न अनेक युवकांना पडतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा दिन साजरा करण्यामागचा उद्देश हा सामाजिक, आर्थिक व राजकीय मुद्द्यांवर तरुणांचा सहभाग आणि भूमिका यावर चर्चा करणे हा आहे. तरुणांना समाजातील अनेक प्रश्नांना पुढे आणण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस देशभरात साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय युवा दिन कसा साजरा केला जातो?

युवा दिनाची सुरुवात युनायटेड नेशन्सने केली होती, ज्याने आंतरराष्ट्रीय (International) महिला दिन, कामगार दिन आणि योग दिन यांसारखे आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्याचे ठरवले. युनायटेड नेशन्स दरवर्षी युवा दिनाची थीम ठरवते. थीमनुसार जगभरात कार्यक्रम आयोजित केले जातात. यात जगभरातील तरुणांना अनेक विषयांवर आपले मत मांडण्याची संधी मिळते. तरुणांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच त्या सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात.

आंतरराष्ट्रीय युवा दिवस २०२२ ची थीम

यंदाचा हा आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरातील अनेक तरुणांच्या अडचणींवर लक्ष केंद्रित करणार आहे. यामध्ये ६ ते १३ वयोगटातील निम्म्या लोकसंख्येला मूलभूत शिक्षण घेता येत नाही. त्यांच्याकडे गणिताची कौशल्ये नसतात आणि बालपणातील गरिबीचा जागतिक मुद्दा त्यांच्याकडे असतो. आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२२ ची थीम ''इंटर-जनरेशनल सॉलिडॅरिटी: सर्व वयोगटांसाठी एक जग तयार करणे" आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com