Investment Tips: दररोज 95 रुपये गुंतवा अन् जमा करा 14 लाख रुपये, सरकारी योजनेचा फायदा घ्या

ग्राम सुमंगल जीवन विमा योजना ही पोस्ट ऑफिसची मनी बॅक योजना आहे. या योजनेत फक्त ग्रामीण भागातील लोकच गुंतवणूक करू शकतात.
Money
Money Saam Tv

मुंबई : गुंतवणूक करताना गुंतवणूकदार नेहमी आपल्या मेहनतीचे पैसे (Money) सुरक्षित कसे राहतील याचा विचार करतात. यासाठी सरकारी योजनांमध्ये पैसा गुंतवणे कधीही फायदेशीर ठरु शकते. पोस्ट ऑफिस योजना अशा लोकांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो. आज पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल विमा योजनेचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो याबाबत माहिती घेऊयात.

Money
Firing On Airplane: 3500 फूट उंचीवर विमानावर गोळीबार, 63 प्रवाशांसह उडणाऱ्या विमानात पुढे जे घडलं...

या योजनेत दररोज 95 रुपयांची छोटी गुंतवणूक करून, गुंतवणूकदार 14 लाख रुपये जमा करु शकतात. ग्राम सुमंगल जीवन विमा योजना ही पोस्ट ऑफिसची मनी बॅक योजना आहे. या योजनेत फक्त ग्रामीण भागातील लोकच गुंतवणूक करू शकतात. (Latest News)

ही योजना समाजातील अशा घटकांसाठी सर्वात फायदेशीर आहे जे विमा योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. यामध्ये महिलांचीही संख्या मोठी आहे. समाजातील दुर्बल घटकही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. योजनेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत कारण सरकार पैशाची हमी देते.

Money
फुटबॉलच्या इतिहासातील काळरात्र; इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार, १२७ जणांचा मृत्यू

का खास ठरते ही योजना?

ग्राम सुमंगल योजना ही एक मनी बॅक योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी परतावा मिळतो. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदारांना यामध्ये डेथ बेनिफिटचाही लाभ मिळतो. जर पॉलिसीधारक पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू झाल्यास नॉमिनीला विमा रकमेचा लाभ मिळतो.

जर तुम्ही 15 वर्षांची पॉलिसी खरेदी केली तर तुम्हाला 6 वर्षे, 9 वर्षे आणि 12 वर्षांमध्ये पॉलिसीचे 20% पैसे परत मिळतील. तसेच उर्वरित 40% रक्कम मॅच्युरिटीनंतर उपलब्ध होईल. दुसरीकडे जर तुम्ही 20 वर्षांसाठी पॉलिसी खरेदी केली तर तुम्हाला 8 वर्षे, 12 वर्षे आणि 16 वर्षांमध्ये 20% पैसे परत मिळतील. तुम्हाला उर्वरित 40% रक्कम मॅच्युरिटीनंतर मिळेल.

म्हणजे जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी ही योजना खरेदी केली आणि तुमची विमा रक्कम 1 लाख रुपये असेल, तर तुम्हाला 20 वर्षांसाठी दरमहा 2,853 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच, तुम्ही दररोज 95 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर सुमारे 14 लाख रुपयांचा परतावा मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला 60% पैसे परत मिळतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com