अ‍ॅपल कंपनीचा iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPad mini भारतात लॉंच

यात नवीन प्रोसेसर A15 Bionic चिपसेट देण्यात आले आहे.
अ‍ॅपल कंपनीचा  iPhone 13, iPhone 13 Pro आणि  iPad mini भारतात लॉंच
अ‍ॅपल कंपनीचा iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPad mini भारतात लॉंचSaam Tv

अ‍ॅपल Apple कंपनीच्या चहात्यांसाठी आजचा दिवस खास ठरणार आहे कारण अ‍ॅपलने आपला नवा कोरा आयफोन 13 आणि आयफोन 13 Pro लाँच केला आहे. आयफोन 13 ला नवीन लुक देण्यात आला आहे. मागच्या बाजूला तिरपे कॅमेरा देण्यात आले आहेत. यात नवीन प्रोसेसर A15 Bionic चिपसेट देण्यात आले आहे. तसेच यावेळी कंपनीने अपडेटेड आयपॅड, वॉच सुद्धा लाँच केली आहे.

हे देखील पहा -

आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनीसाठी डिस्प्ले आकार अनुक्रमे ६.१-इंच आणि ५.४-इंच असणार आहे. Apple iPhone 13 हा नवीन प्रोसेसर A15 Bionic चिपसेटवर चालेल. यात 6-कोर CPU आहे ज्यामध्ये २ हाय परफॉर्मंस कोर आणि ४ इफीशियंसी कोर आहे. यात मशीन लर्निंग साठी 16-कोर न्यूरल इंजिन आहे. कॅमेऱ्यात नवी फिचर देण्यात आले आहे. यात नवीन सिनेमॅटिक मोड देण्यात आला आहे आहे. तसेच व्हिडीओ रेकॉर्ड करत असताना तुम्ही फोकस कमी जास्त देखील करू शकणार आहे. त्याचबरोबर तुम्ही डॉल्बीमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता.तसेच आयफोन 13 Pro सुद्धा लाँच केला आहे.

अ‍ॅपल कंपनीचा  iPhone 13, iPhone 13 Pro आणि  iPad mini भारतात लॉंच
नऊ महिन्यांच्या गर्भवतीसारखे झाले होते तरुणाचे पोट; डॉक्टरकडे गेल्यावर कळले...

या फोनमध्ये ३ रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. iPhone 13 Pro मध्ये जास्त ग्राफिक्स आहे. पूर्णक्षमतेने हा फोन चार्ज केल्यावर एक दिवस तुम्ही हा फोन वापरू शकता.आयफोन 13 Pro ची किंमत १०९९ डॉलर पासून सुरू आहे. याची विक्री २४ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आयफोन-13 ची किंमत ६९९ डॉलर असणार आहे आयफोन 13 प्रोची किंमत ९९९ डॉलर इतकी असणार आहे. आयफोन-13 आणि आयफोन-13 मिनी सुद्धा लाँच करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com