
iPhone Bumper Discount : हल्ली iPhone चे प्रत्येक तरुणाला वेड लागले आहे. जगभरातील अनेक लोक iphone चे स्मार्टफोन चाहाते झाले आहे. त्यातच हा स्मार्टफोन नवनवीन फीचर्स आणून तरुणांना आपल्याकडे आकर्षित करत आहे.
पण आयफोन खरेदी करणं हे काही सोपे काम नाही. परंतु ही खुशखबर एकूण आयफोनप्रेमी आयफोन खरेदी करण्यास तयार असतील. त्याचं कारण म्हणजे, फ्लिपकार्टवरती लागलेला सेल. फ्लिपकार्टच्या या सेल मध्ये तुम्हाला चांगलीच सूट मिळणार आहे. आयफोन 12 मिनी हे सर्वात प्रसिद्ध आणि गाजलेलं मॉडेल आहे. फ्लिपकार्टच्या या सेल मध्ये आयफोन 12 मिनी 64GB च्या वेरियंट वरती 36% एवढी सूट मिळणार आहे. या संधीचा तुम्ही लगेच फायदा घेऊ शकता
ही डील नेमकी काय आहे हे जाणून घेऊ.
फ्लिपकार्ट ही कंपनी काही बँकांसोबत डील उपलब्ध करून देत आहे. ज्यामध्ये आयफोन 12 मिनी वरती 36 टक्के एवढी मोठी सूट दिली जाणार आहे.
जर तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिटकार्ड मधून ट्रांजेक्शन करत असाल तर, तुम्हाला 10 टक्के म्हणजेच 1500 रुपये एवढी सूट दिली जाणार आहे.
पण याची एक अट आहे ती म्हणजे 5000 पेक्षा जास्त ऑर्डर असेल तरच तुम्हाला या संधीचा पुरेपूर वापर करून घेता येणार आहे.
जर तुम्ही फ्लिपकार्ट एक्सिस बँक कार्ड मधून आयफोन खरेदी करताय तर तुम्हाला 5% रक्कम परत मिळू शकते.
अशा प्रकारे अनेक बँकांमधून फ्लिपकार्ट वरती वेगवेगळ्या प्रकारची सूट मिळणार आहे.
तुमच्या माहितीसाठी एक महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक ऑफरचे वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे फोन खरेदी करताना नियम व अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.
जर तुम्ही 36% सूटवर फोन खरेदी करतायं तर तुम्हाला 37,999 रूपये खर्च करावे लागतील आणि जर का तुम्हाला बँक डिस्काउंटवर खरेदी करायचा असेल तर, तुम्हाला 1500 रूपये कमी द्यावे लागतील.
जर तुम्हाला पंधरा हजार पेक्षाही कमी रुपयांमध्ये फोन खरेदी करायचा असेल तर, तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करू शकता.
तुमचा जुना फोन जेवढ्या चांगल्या अवस्थेत असेल तेवढाच जास्त डिस्काउंट तुम्हाला मिळेल.
अशातच तुम्ही फ्लिपकार्ट वरती तुमच्या जुन्या फोनचे 23 हजार रुपये प्राप्त करू शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.