IRCTC देतेय रेल्वेच स्वस्तात मस्त टूर पॅकेज, 5 ज्योतिर्लिंग देता येईल एकाच वेळी भेट !

महादेवांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
IRCTC Travel
IRCTC Travel Saam Tv

IRCTC Tour Packages: महादेवांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन(IRCTC) यांच्यातर्फे एक उपक्रम चालवला जाणार आहे.

हे भगवान महादेवाच्या ज्योतीलिंगाच्या दर्शनासाठी टूर (Tour) प्लॅन केले आहे त्यामध्ये पाच ज्योतिर्लिंगांचा समावेश आहे.महादेवांच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शनाची तुमची इच्छा असेल तर तुम्ही या रेल्वे (Railway) टूर चा लाभ घेऊ शकता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सुविधा रेल्वे कडून लागू होणार आहे.चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची सर्व माहिती.

IRCTC Travel
Winter Travel Tips : हिवाळ्यात प्रवास करताय? अशी घ्या त्वचेची आणि केसांची काळजी

ट्रिप कधी होणार आहे?

IRCTC तर्फे या ट्रीप ची सुरुवात 4 फेब्रुवारीपासून नऊ दिवसांचा प्रवास सुरू होईल आणि 12 फेब्रुवारीला संपेल. प्रवासाची सुरुवात जयपुर येथील गुलाबी शहरापासून होईल.

रेल्वे कुठे जाणार -

वेरावल, नाशिक, द्वारका, पुणे आणि औरंगाबाद असा ज्योतिर्लिंगांचा अनुक्रमानुसार जाणार आहे. भीमाशंकर,त्रंबकेश्वर, नागेश्वर, घृष्णेश्वर आणि सोमनाथ या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाणार आहेत द द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.

IRCTC Travel
Travel Bag Hacks : ट्रॅव्हल बॅगशी संबंधित 'हे' हॅक करेल तुमचे काम सोपे !

कोण कोणत्या सुविधा मिळणार आहेत -

रेल्वेने प्रवास श्रेणी दोन विभागात विभागली आहे त्यातील पहिल्या श्रेणीचे भाडे २१,३९० रुपय आहे तर दुसऱ्या श्रेणीचे भाडे २४,२३० रुपय एवढे ठेवण्यात आले आहे. भारत गौरव टूरिस्ट अंतर्गत हा प्रवास करण्यात येणार आहे.

रेल्वे जयपूर वरून सुटेल त्यानंतर पुढे अजमेर ,भीलवाडा ,उदयपूर मार्गे नाशिकला पोहोचणार आहे नाशिक येथील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येईल. आय आर सी टी सी च्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता किंवा रेल्वेच्या व्हाट्सअप नंबर वरून सविस्तर माहिती मिळवू शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com