IRCTC New Facilities : आता ट्रेनमध्ये मिळणार मधुमेही आणि लहान मुलांना सूपरफूड, 'या' विशेष सुविधांचाही लाभ !

जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल, तर तुम्ही भारतीय रेल्वेने दिलेल्या या सुविधेचा लाभ देखील घेऊ शकाल.
IRCTC New Facilities
IRCTC New FacilitiesSaam Tv

IRCTC New Facilities : भारतीय रेल्वे तिच्या ग्राहकांना नेहमी अनेक सवलती देत असते. मध्यतंरी नवरत्रौत्सवातही उपावास थाळी ही फ्री देण्यात आली. तसेच, जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल, तर तुम्ही भारतीय रेल्वेने दिलेल्या या सुविधेचा लाभ देखील घेऊ शकाल.

दररोज करोडो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेमध्ये अशा अनेक गाड्या आहेत ज्या खूप लांब मार्गांवर धावतात. अशा परिस्थितीत, या ट्रेनमधील प्रवाशांनी IRCTC (IRCTC Food Menu) द्वारे जेवण ऑर्डर करणे आवश्यक आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ट्रेनमध्ये चविष्ट आणि स्वच्छतेने तयार केलेले अन्न पुरवण्यासाठी प्रयत्न करते.

आता IRCTC ने असा निर्णय घेतला आहे, ज्याचा थेट फायदा (Benefits) लाखो रेल्वे प्रवाशांना होणार आहे. तसेच आता तिच्या मेनूमध्ये अधिकाधिक हेल्दी आणि टेस्टी फूड असणार आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा ट्रेनमध्ये (Train) प्रवास करणार्‍या मुलांना आणि मधुमेही रुग्णांना (फूड फॉर डायबेटिक) होणार आहे.

IRCTC New Facilities
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! IRCTC ने बदलले ऑनलाइन तिकीट बुकिंगचे नियम, जाणून घ्या

रेल्वे बोर्ड आता IRCTC ला मेनू ठरवण्यासाठी सूट देईल. यासह, आता IRCTC आपल्या मेनूमध्ये (IRCTC स्पेशल फूड मेनू) स्थानकांचे स्थानिक आणि चवदार खाद्यपदार्थ जोडण्यास सक्षम असेल. यासोबतच IRCTC आता हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी आणि लहान मुलांसाठीही खास मेनू तयार करू शकणार आहे. या सर्व गोष्टींमुळे रेल्वेत प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. यासोबतच आता प्रवाशांना कस्टमाइज प्लेटची सुविधाही मिळणार आहे.

आयआरसीटीसी मेनू ठरवेल

आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक गाड्यांमध्ये प्रवाशांच्या जेवणाचे पैसे रेल्वे तिकिटाच्या भाड्यात समाविष्ट केले जातात. अशा परिस्थितीत रेल्वेने आयआरसीटीसीला निश्चित किमतींमध्ये मेनू ठरवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच प्रीपेड ट्रेनमध्ये अनेक ब्रँडचे खाद्यपदार्थ आणि ए-ला-कार्टे खाद्यपदार्थ विकले जातील असेही सांगण्यात आले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आयआरसीटीसी स्वतः अ-ला-कार्टे खाद्यपदार्थांची किंमत ठरवेल.

जेवणात कोणताही बदल होणार नाही

जरी IRCTC ने प्रीपेड गाड्यांचा मेनू बदलण्याची परवानगी दिली असली तरी प्रवाशांसाठी बजेट सेगमेंट मेनूमध्ये कोणताही बदल होणार नाही असे देखील सांगितले आहे. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधील IRCTC चा मेनू पूर्वीसारखाच राहील. जनता भोजन अंतर्गत ग्राहकांना पुरी भाजी, लोणचे, चहाचे पॅकेज मिळणार आहे. दुसरीकडे, जर एखाद्याने ट्रेनमधील निश्चित मेनूशिवाय इतर खाद्यपदार्थ ऑर्डर केले तर IRCTC त्याचा मेनू आणि किंमत ठरवू शकते.

IRCTC New Facilities
World Longest Train : 'या' जगात आहे देशातील सगळ्यात लांब ट्रेन, पाहाल तर थक्क व्हाल

गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही

भारतीय रेल्वेने आयआरसीटीसीला सांगितले आहे की ते खाद्यपदार्थांच्या मेनूमध्ये बदल करताना अन्नाच्या गुणवत्तेशी तडजोड करणार नाही. यासोबतच स्वयंपाक करताना वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या दर्जाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. यासोबतच रेल्वेने सांगितले आहे की, मेनू दरानुसार असेल आणि कोणताही बदल करण्यापूर्वी ग्राहकांना माहिती देणे आवश्यक आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com