
Confirm Ticket Booking : बरेचदा असे होते की, आपल्याला लांबचा प्रवास करायचा असतो. त्यासाठी ट्रेनचे कन्फर्म तिकीट बुक करताना आपल्याला नाकी नऊ येतात. तरी देखील आपल्याला कन्फर्म तिकीट काही मिळत नाही.
भारतीय रेल्वे नियमानुसार आपल्याला तिकीट (Ticket) बुक करण्यासाठी आपल्या २४ तासांआधी त्याची प्रक्रिया सुरु करावी लागते. तसेच तत्काळ तिकीटचे काउंटर ओपन झाल्यानंतर बुकिंग (Booking) करण्यापूर्वीचे ते तिकीट फुल होऊन जाते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचे तत्काळ तिकीट कन्फर्ममध्ये बुक होईल. जाणून घ्या कसे
आज आम्ही तुम्हाला IRCTC च्या एका 'मास्टर फीचर'बद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट बुक करू शकता. जेव्हा तुम्ही तत्काळ तिकीट बुक करता तेव्हा फॉर्ममध्ये तुमचे नाव आणि इतर माहिती भरा, पण बुकिंग काउंटर उघडताच आपली माहीती ही दिसेनाशी होते. तुमची वैयक्तिक माहीती पुन्हा भरेपर्यंत तात्काल तिकीट हे मिळणे बंद झालेले असते.
यासाठी IRCTC ने एक नवे फीचर लॉन्च केले आहे ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत असेल. जर तुम्हाला तत्काळ तिकीट बुक करायचे असेल तेव्हा हे फीचर नक्की वापरा. ज्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती आगाऊ जतन केली जाईल आणि तुम्हाला फक्त पैसे भरून कन्फर्म तिकीट घ्यावे लागेल.
1. कसे कराल बुक ?
हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला IRCTC अॅपवर जावे लागेल.
त्यात तुमचे खाते उघडावे लागेल.
यानंतर, प्रोफाइल विभाग निवडल्यानंतर, 'Add/Modify Master List' या पर्यायावर क्लिक करा.
येथे तुमची सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुमची मास्टर लिस्ट तयार होते.
आता तिकीट बुक करताना माय पॅसेंजर लिस्टवर क्लिक करा आणि पेमेंट करून तिकीट मिळवता येईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.