Navratri Festival 2022 : आनंदाची बातमी! नवरात्रौत्सवामध्ये उपवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मिळणार 'व्रत थाळी', जाणून घ्या

आता लांब पल्ल्याच्या प्रवासात देखील उपवासाचे पदार्थ मिळणार, IRCTC चा खास उपक्रम
Navratri Festival 2022
Navratri Festival 2022Saam TV

Navratri Festival 2022 : कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर हल्ली सगळे सण उत्सव आनंदात साजरे केले जात आहेत. गणेशोत्सवानंतर आता शारदीय नवरात्रौत्सव देखील मोठ्या जल्लोष साजरा केला जाणार आहे.

नवरात्रौत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक नऊ दिवसांचा उपवास करत असतात. मात्र, या उपवास करणाऱ्या भाविकांना लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर त्यांना उपवास सुटण्याची भीती असते. त्याचं कारणं म्हणजे, रेल्वे प्रवासादरम्यान उपवासाचे पदार्थ मिळण्याची शक्यता कमी असते. जास्तीत जास्त बटाट्याचे (Potatoes) वेफर्स या भाविकांना मिळू शकतात.

Navratri Festival 2022
Navratri Fast Low Calorie Food : नवरात्रीच्या नऊ दिवसात उपवासाचे 'हे' पदार्थ खा, राहाल फिट !

मात्र, आता भारतीय रेल्वेच्या IRCTC विभागाने उपवास करणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे, ती म्हणजे नवरात्रौत्सवाच्या या काळात जे भाविक लांबचा प्रवास करतील त्यांना आता रेल्वेमध्ये उपवासाचे खाद्य पदार्थ उपलब्ध होणार आहेत.(Indian Railway Catering and Tourism Corporation)

आयआरसीटीसीने (IRCTC) ही खास सोय आपल्या प्रवाशांसाठी केली असून या उपक्रमाला त्यांनी 'व्रत थाळी' असं नाव दिलं आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवादरम्यान उपवास करणाऱ्या आणि रेल्वे प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी ही चागंली बातमी आहे. आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, ही व्रत थाळी देशभरातील ४०० रेल्वे (Train) स्थानकांवर उपलब्ध होणार आहे.

Navratri Festival 2022
Navratri Special Recipe 2022 : नवरात्रीच्या उपवासात खा; 'हा' स्पेशल रायता, अपचनाची समस्या होईल दूर !

कशी मागवाल 'व्रत थाळी'?

ही थाळी मागविण्यासाठी प्रवाशांना १३२३ या नंबरवरती कॉल करून आधी बुकिंग करावं लागणार आहे. त्यानंतर अगदी काही क्षणामध्ये प्रवाशांना उपवासाची थाळी उपलब्ध होणार आहे. शिवाय हा उपक्रम मागील वर्षी देखील राबविण्यात आला होता अशी माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना आयआरसीटीसीचे पीआरओ आनंद कुमार म्हणाले की, नवरात्रौत्सवाच्या काळात अनेक प्रवाशांना उपवासाच्या वेळी खाण्यापिण्याची चिंता असते. हे लक्षात घेऊन जलद स्पेशल थाळीची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार ही व्यवस्था पुढे चालू ठेवणार असल्याचंही कुमार यांनी सांगितलं.

व्रत थाळीत काय मिळेल?

९९ रुपये – फळे, बकव्हीट पकोरी, दही

९९ रुपये – २ पराठे, बटाटा करी, साबुदाणा खीर

१९९ रुपये – ४ पराठे, ३ भाज्या, साबुदाणा खिचडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com