
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC)देशातील आणि परदेशातील विविध ठिकाणांना भेट देण्यासाठी टूर पॅकेज लाँच करते. ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यासाठी IRCTC सतत नवीन टूर पॅकेज लॉन्च करत असते.
भगवान शंकर हे अनेकांचे आराध्य स्थान आहे. जर तुम्ही फिरण्याचा प्लान करत असाल आणि ७ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर IRCTC चा नवा टूर प्लानला भेट देऊ शकता. जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर
2. पॅकेजमध्ये काय समाविष्ट आहे?
या यात्रेत ओंकारेश्वर, महाकालेश्वर, सोमनाथ, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन होईल.
3. पॅकेज किती दिवसांचे असेल?- 09 रात्री आणि 10 दिवसांच्या
4. पॅकेजमध्ये काय मिळेल?
या पॅकेजमध्ये, 02 AC, 03 AC आणि स्लीपर क्लासमध्ये प्रवास, नाश्ता आणि शाकाहारी दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण आणि AC/Non AC बसने स्थानिक भागात प्रवास (Travel) करणे समाविष्ट केले जाईल.
5. IRCTC पॅकेजची किंमत
पर्यटकांनी या टूर पॅकेजच्या कम्फर्ट क्लासमध्ये प्रवास केल्यास त्यांना प्रति व्यक्ती ४२,२०० रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, या टूर पॅकेजच्या स्टॅडर्ड कॅटेगरीमध्ये प्रवास करणाऱ्या पर्यटकांना ३१,८०० रुपये प्रति व्यक्ती भाडे द्यावे लागेल. इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या पर्यटकांना प्रति व्यक्ती १८,९५० रुपये भाडे द्यावे लागणार आहे. जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर त्याचे भाडे वेगळे आकारले जाईल.
6. बुकिंग कसे कराल?
या प्रवासाचे बुकिंग IRCTC वेबसाइट www.irctctourism.com वरून करता येईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.