How To Clean Milk Bottle : बाटलीतले दुध मुलाला पाजताय? वेळीच घ्या काळजी अन्यथा पडेल आजारी

Baby Bottle Clean : नवजात बाळ खूप नाजूक असते त्यामुळे बाळाची काळजी घेणे हे सोपे काम नसते.
How To Clean Milk Bottle
How To Clean Milk Bottle Saam Tv

Milk Bottle Clean : नवजात बाळ खूप नाजूक असते त्यामुळे बाळाची काळजी घेणे हे सोपे काम नसते. बाळाला लगेच संसर्ग आणि रोग होण्याची शक्यता असते त्यामुळे योग्य ती काळजी आपण घेतलीच पाहिजे.

त्यातील एक म्हणजे फीडिंग बाटलीचा संसर्गापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. बाळाच्या दुधाची (Milk) बाटली रोज स्वच्छ करणे आणि बॅक्टेरियायुक्त असणे महत्त्वाचे असते. बरेच पालक त्याचे खाऊन झाल्यानंतर बॉटल स्वच्छ करून ठेवतात आणि पुन्हा वापरण्यापूर्वी ती साफ करत नाही.

त्यामुळे बाळाला संसर्ग (Infection) होण्याची शक्यता असते मोकळ्या हवेत ठेवलेल्या बाटल्या दूषित होतात. दुधाची बॉटल स्वच्छ ठेवण्याचा योग्य मार्ग आज आपण जाणून घेऊया.

How To Clean Milk Bottle
Baby Care : लहान मुलांना आंघोळ घालताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा ! अन्यथा, बाळ पडेल आजारी

बाळाची दुधाची बाटली स्वच्छ करण्याची पद्धत -

चांगल्या प्रतीची बॉटल वापरत आहात का जी सहज बॅक्टेरियापासून मुक्त होईल हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रथम बाटली चे सर्व भाग उघडून एका भांड्यात ठेवा आणि पाण्याने स्वच्छ धुवा. आता वापरलेली बॉटल सॉफ्ट डिटर्जंट आणि पाण्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्वच्छ करा.

एका मोठ्या कढई इतके पाणी भरा की बाटली पूर्णपणे पाण्यात जाईल, पाणी उकळायला लागल्यावर त्यात बाटली पाच मिनिटे उकळत ठेवा आता गॅस कमी करून भांडे झाकून ठेवा.लक्षात ठेवा की पाणी बाहेर उडी मारू नये पाच मिनिटे झाल्यानंतर हाताने स्पर्श न करता स्वच्छ भांडीच्या मदतीने बाटली बाहेर काढा.

आता त्यांना स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुऊन त्यानंतर बाटली बाहेर काढा आता एकदा बाटली फिल्टर केलेल्या पाण्याने धुवा आणि चांगले वाळवा प्रत्येक वेळी वापरतानाही प्रक्रिया पुन्हा करा. तुम्ही या स्वच्छ केलेल्या बाटल्या फ्रिजमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवू शकता.

How To Clean Milk Bottle
New Born Baby : बाळ पळविणा-या दाम्पत्याने स्वत:च्या मुलीला साठ हजारांत विकले, पाेलिसांची माहिती

बाटली किती वेळा स्वच्छ करावी -

जर समजा तुमचे बाळ दिवसातून सहा वेळा दूध पीत असेल तर प्रत्येक वापरानंतर बाटली पूर्णपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे. तुम्ही बाटलीला धुवून काही वेळ गरम पाण्यात सोडू शकता.

तुम्ही बाटली स्वच्छ करण्यासाठी वापरत असणारे ब्रश आणि कापड स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. ब्रश आणि कापड उन्हातच वाळवावी त्यांना बंद खोलीत किंवा ओलसर ठिकाणी ठेवू नये त्यामुळे बॅक्टेरिया वाढण्याचे अधिक शक्यता असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com