Emotional Attachment In Relationship : नात्यात इमोशनल अटॅचमेंट गरजेचे आहे का ? जाणून घ्या

Relationship Tips : हल्लीच्या काळात लहान लहान गोष्टींमुळे नातेसंबंध तुटतात. नाते दीर्घकाळ टिकवणे आव्हानांनी भरलेले असते.
Emotional Attachment In Relationship
Emotional Attachment In RelationshipSaam Tv

Emotional Attachment In Couples : जर जोडप्यांच्या विचार तर त्यांचे नाते इमोशनल अटॅचमेंट वर अवलंबून असते. त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी शारीरिक आकर्षणापेक्षा, त्यांच्यातील भावनिक बंध घट्ट असणे अधिक महत्त्वाचे असते.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यातील इमोशन कमकुवत होत आहेत तर त्यामुळे तुमच्या नात्यावर परिणाम पडू शकतो. म्हणून जाणून घ्या की तुमच्या नात्यात (Relation) इमोशनल बॉण्डिंग तुम्ही कसे वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊया याविषयी माहिती.

Emotional Attachment In Relationship
Relationship Tips : पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत चुकूनही करू नका अशी मस्करी, बिघडेल तुमचे नाते

प्रेम व्यक्त करा -

इमोशनल बॉण्डिंग वाढवण्यासाठी तुमच्या जोडीदाराबद्दलचे तुमचे प्रेम व्यक्त करा. प्रेम व्यक्त करण्यासाठी केवळ एखाद्या खास प्रसंगाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही दिवसातून अनेक वेळा एकमेकांबद्दल प्रेम (Love) व्यक्त करू शकता. असे केल्याने तुमच्या पार्टनरला स्पेशल वाटते आणि तुमच्या प्रेमाचे महत्त्व समजते. त्यामुळे इमोशनल बॉण्डिंग कायम टिकून राहण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

लॉयल रहा -

कोणतेही नाते घट्ट करण्यासाठी नात्यातील प्रामाणिकपणा गरजेचा आहे. त्यामुळे तुम्ही जर नात्यात लॉयल असाल तर तुमचा पार्टनर कधीच दुसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यात येणार नाही. एवढेच नाही तर तुम्ही प्रामाणिक राहिल्यामुळे तुमच्या जोडीदाराचा आत्मविश्वासही वाढेल.

Emotional Attachment In Relationship
Mental Trauma In Relationship : मानसिक छळ केल्यानंतरही तुमचे त्याच्यावर प्रेम आहे? हे प्रेम नाही तर मानसिक ट्रॉमा असू शकते, जाणून घ्या लक्षणे

क्षमा करणे आवश्यक -

लहान लहान गोष्टींवरून एकमेकांसोबत भांडणे किंवा रागावणे यामुळे नाते तुटू शकते. त्यापेक्षा माफ करणे ही मजबूत नात्याची ओळख आहे. अशा वेळी तुमच्या जोडीदाराकडून काही चूक झाली असेल तर त्यांना रागवण्यापेक्षा, त्याचा अपमान करण्याऐवजी त्यांना माफ करणे योग्य ठरेल.

समजून घेण्याचा प्रयत्न -

तुमच्या जोडीदाराला तुम्हाला काही सांगायचे असेल तर त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. दरम्यान तुमच्या पार्टनरच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल गैरसमज असेल तर त्याला सोप्या शब्दात समजावून सांगा.

मिसकम्युनिकेशन पासून दूर -

कोणतेही नाते कम्युनिकेशन गॅपमुळे बिघडते. त्यामुळे हे टाळण्यासाठी तुमच्या मनात कोणतीही गोष्ट ठेवू नका. त्यासोबतच मोकळेपणाने बोला आणि जोडिरारलाही त्यांच्या मनातील गोष्टी बोलण्याची संधी द्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com