Drinking Water Time : पाणी पिण्याची देखील योग्य वेळ आहे का? असेल ! तर ती कोणती?

निरोगी जीवनासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
Drinking Water Time
Drinking Water Time Saam Tv

Drinking Water Time : निरोगी जीवनासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. हे केवळ आपल्या शरीराला हायड्रेटेड राहण्यास मदत करत नाही तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणे, लाळ बनवणे आणि शरीराच्या विविध भागांमध्ये पोषक द्रव्ये पोहोचवणे यासारख्या महत्त्वपूर्ण शारीरिक कार्यांमध्ये देखील मदत करते.

जसे की, जेव्हा आपण पुरेसे पाणी पीत नाही, तेव्हा स्वत:ला आरोग्यविषयक समस्यांसह निर्जलीकरण, मूत्रमार्गात संक्रमण, सांधे आणि स्नायूंच्या समस्या जाणवू लागतात. परंतु, याचे कारण फक्त पुरेसे पाणी पिणे नाही तर त्याची योग्य वेळ (Time) देखील ठरवणे गरजेची आहे.

पाणी प्रत्येकजण पितो, परंतु ते कसे प्यावे आणि त्याचे योग्य वेळापत्रक काय आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. निरोगी (Healthy) व्यक्तीने उन्हाळ्यात ८ ते १० ग्लास पाणी प्यावे, तर हिवाळ्यातही ६ ते ७ ग्लास पाणी प्यावे. शरीराला हायड्रेट ठेवणे महत्वाचे आहे. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात शरीर सहजासहजी निर्जलीकरण होत नाही, परंतु जर एखाद्या व्यक्तीने खूप कमी पाणी प्यायले किंवा योग्य वेळी ते प्यायले नाही तर त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

Drinking Water Time
Drinking Water : तुम्हाला देखील उभे राहून पाणी पिण्याची सवय आहे ? वेळीच थांबा, होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

सकाळी उठल्यानंतर -

सकाळी उठल्यानंतर शरीरातील अंतर्गत अवयव सक्रिय करण्यासाठी एक ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील घाणही बाहेर पडते.

खाण्यापूर्वी ३० मिनिटे -

अन्न खाण्यापूर्वी ३० मिनिटे पाणी प्यावे. यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर लगेच पाणी कधीही पिऊ नका कारण पाणी शरीरातील पाचक रस पातळ करते, ज्यामुळे पचन प्रक्रिया असंतुलित होते.

झोपण्यापूर्वी -

झोपण्याच्या एक तास आधी पाणी प्यायल्याने कोणत्याही प्रकारचा द्रव कमी होत नाही. त्यामुळे शरीरात पुरेसे पाणी शिल्लक राहते. या सगळ्यात तुम्ही पाणी पिऊ शकत नाही असे अजिबात नाही. तुम्ही तुमच्या शरीरानुसार पाण्याचे सेवन करू शकता.

Drinking Water Time
Drinking Water Time : वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ? जेवणापूर्वी की, जेवणानंतर

पाणी पिण्याचे योग्य वेळापत्रक काय आहे -

  • प्रत्येक व्यक्तीचे वेळापत्रक त्याच्या कामानुसार वेगवेगळे असू शकते. योग्य वेळ काय आहे ते जाणून घ्या.

  • सकाळी ७ वाजता उठल्यास एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीर दिवसभर हायड्रेट राहते.

  • नाश्ता करण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या. जर तुम्ही ९ वाजता नाश्ता केला असेल तर साधारण 1 तासानंतर एक ग्लास पाणी प्या.

  • ११:३० वाजता तुम्ही पुन्हा पाणी प्या. हे दुपारच्या जेवणाच्या ३० मिनिटांपूर्वी देखील असू शकते.

  • दुपारचे जेवण झाल्यावर पुन्हा पाणी प्या. यामुळे शरीर अन्नातील पोषक तत्वे योग्य प्रकारे शोषून घेतील.

  • चहाच्या ब्रेक दरम्यान काहीतरी गोड प्या जेणेकरून तुमचे मन ताजे राहते आणि पाण्याची पातळी राखली जाते.

  • ५ वाजता पुढचा ग्लास पाणी प्या म्हणजे रात्रीच्या जेवणात जास्त खाणार नाही.

  • ८ वाजता तुम्ही पुन्हा पाणी प्या आणि अन्न खाल्ल्यानंतर सुमारे १ तासानंतर पाणी प्या.

  • शेवटी, झोपण्याच्या सुमारे १ तास आधी पाणी प्या.

  • एकूणच, जर तुम्ही अन्न आणि शारीरिक हालचाली लक्षात घेऊन पाणी वापरत असाल तर हे एक चांगले वेळापत्रक आहे.

  • दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By : Shraddha Thik

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com