5G Network : तुमचंही 5G नेटवर्क सारखं गंडतंय ? मग फोनमधली ही सेटिंग लगेच बदला

Network Issue : 5G सेवा देशभरात आणली गेली आहे.
5G Network
5G NetworkSaam Tv

5G Network Issue : 5G सेवा देशभरात आणली गेली आहे. Airtel, Reliance Jio सारख्या दूरसंचार कंपन्यांनी देशाच्या अनेक भागांमध्ये त्यांची 5G सेवा सुरू केली आहे. तुमचा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करत असल्यास, तुम्ही ते वापरू शकता.

परंतु तरीही देशात असे अनेक वापरकर्ते आहेत ज्यांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) 5G नेटवर्क कसे अॅक्सेस करावे हे माहित नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमधील काही सेटिंग्ज बदलावी लागतील. याविषयी सर्व काही जाणून घेऊया.

5G Network
New Smartphone Buying : 5G मोबाईल घेताय? ही बातमी आवश्य वाचा; 'या' 6 गोष्टी वाचुनच मोबाईल खरेदी करा...

एअरटेलने सांगितले की, जेव्हा देशात 4G नेटवर्क (Network) सुरू झाले तेव्हा अनेक वापरकर्त्यांना त्यांचे सिम बदलावे लागले. पण 5G नेटवर्कच्या बाबतीत असे नाही. तुम्हाला तुमचे 4G सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. ते आधीच 5G तंत्रज्ञानाला सपोर्ट देतात. पण तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क वापरण्यासाठी तुम्हाला काही बदल करावे लागतील.

तुमचा Android फोन 5G ला सपोर्ट करतो की नाही हे कसे तपासायचे?

  • तुमच्या अँड्रॉइड फोनवर सेटिंगमध्ये जा.

  • येथे तुम्हाला 'वाय-फाय आणि नेटवर्क' पर्यायावर जावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला 'सिम आणि नेटवर्क' पर्यायावर जावे लागेल.

  • येथे तुम्हाला 'Preferred Network' नावाचे हेडर दिसेल आणि फोन समर्थित सर्व सेल्युलर तंत्रज्ञान येथे दिसतील.

  • जर तुम्हाला या सूचीमध्ये 5G दिसत असेल, तर तुमचा फोन 5G ला सपोर्ट करतो.

5G Network
5G Service : या शहरांमध्ये घेता येणार 5G सेवांचा लाभ, जाणून घ्या
  • तुमचा iPhone 5G ला सपोर्ट करतो की नाही ते येथे तपासा

  • तुमच्या फोनच्या सेटिंग्जवर जा.

  • आता सेल्युलर/मोबाइल डेटा पर्यायावर टॅप करा.

  • येथे तुम्हाला डेटा रोमिंग, डेटा मोड आणि व्हॉइस आणि डेटा असे पर्याय दिसतील.

  • यानंतर तुम्हाला Voice आणि Data वर टॅप करावे लागेल.

  • तुम्हाला येथे 5G पर्याय दिसत असल्यास, तुमचा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो.

फोनमध्ये 5G नेटवर्क कसे चालू करावे?

Android :

  • फोनच्या सेटिंगमध्ये जा.

  • 'नेटवर्क आणि इंटरनेट' पर्यायावर टॅप करा.

  • आता सिम पर्यायावर क्लिक करा.

  • Preferred Network type वर क्लिक करून 5G निवडा आणि तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क चालू होईल.

5G Network
OnePlus 11R 5G : OnePlus च्या प्री-बुकिंगवर 4,999 रुपयांचा Earbuds मिळतोय फ्री ! जाणून घ्या फीचर्स व किंमत

ऍपल iPhone :

  • तुमच्या iPhone वर सेटिंग्ज वर जा.

  • सेल्युलर वर टॅप करा आणि नंतर सेल्युलर डेटा पर्याय निवडा.

  • Voice & Data या पर्यायावर क्लिक करा.

  • आता, तुमच्या फोनवर 5G सक्रिय करण्यासाठी 5G वर टॅप करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com