Janmashtami 2021: मधुमेहींसाठी आरोग्यदायी आहेत 'या' ५ मिठाई

मधुमेहाच्या रूग्णांसाठी मिठाईचा जास्त वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो
Janmashtami 2021: मधुमेहींसाठी आरोग्यदायी आहेत 'या' ५ मिठाई
Janmashtami 2021: मधुमेहींसाठी आरोग्यदायी आहेत 'या' ५ मिठाई

भारतीय सण मिठाईशिवाय पूर्ण कधीही पुर्ण होऊ शकत नाही. आज देशभरात जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. या सणादरम्यान, देवदेवतांसाठी प्रसाद म्हणून आणि कुटुंबासाठी मिठाई तयार केली जाते. मात्र मधुमेहींना मिठाई खाणे वर्ज्य असते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी मिठाईचा जास्त वापर हानिकारक ठरू शकतो. अशा परिस्थितीत, काही आरोग्यदायी मिठाईंचे सेवन केल्यास मधुमेही रुग्णांलाही मिठाई खाण्याचा आनंद घेता येईल.

मधुर मिष्टान्न पाककृती

सातूचे लाडू - नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे सातू घ्या. २-३ चमचे साजूक तूप घालून मध्यम आचेवर काही मिनिटे परतून घ्या. नंतर प्रमाणानुसार पाणी घाला आणि थोडे ओलसर करा. चव आणि सुगंध वाढवण्यासाठी शुगर फ्री स्वीटनर आणि वेलची पावडर घाला. आता त्याचे लाडू तयार करा. त्यांना खाण्यापूर्वी थंड होऊ द्या.

पनीर खीर - नॉन -स्टिक पॅनमध्ये मध्यम आचेवर दूध गरम करा आणि उकळी येऊ द्या. दूध चमच्याने ढवळत रहा. वेलची पावडर आणि सोबत शुगर फ्री स्वीटनर घाला. पनीर चुरा करून पॅनमध्ये टाका. चांगले मिक्स करा. ते थंड होऊ द्या आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा. तुमची पनीर खीर तयार आहे.

Janmashtami 2021: मधुमेहींसाठी आरोग्यदायी आहेत 'या' ५ मिठाई
देवघरातील काळवंडलेल्या मुर्त्या साफ करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

शुगरफ्री श्रीखंड - एका भांड्यात दूध काढा. केशरचे काही तुकडे घाला आणि काही वेळ तसेच सोडा. एका भांड्यात घट्ट दही आणि वेलची पूड घाला. चांगले मिक्स करावे. आता त्यात शुगर फ्री स्वीटनर घाला, पुन्हा मिसळा. ते फ्रिजमध्ये ठेवा, काही वेळानंतर तुम्ही या मिठाईचा आनंद घेऊ शकता.

नारळ बर्फी - नारळ किसून घ्या. एका नॉन स्टिक पॅनमध्ये २-३ चमचे तूप घाला. ते 4-5 मिनिट हा नारळाचा खीस चांगला हलवत रहा. त्यात वेलची पावडरसह शुगरफ्री स्वीटनर घाला. ओलसर करण्यासाठी त्यात थोडे पाणी घाला. ते थोडे थंड होऊ द्या आणि नंतर ते प्लेटवर काढून घ्या. नारळाच्या या मिश्रणाला हलक्या हातांनी बर्फीचा आकार द्या. काही काळ फ्रीजमध्ये ठेवा आणि काही वेळाने खा.

सफरचंद रबडी -एका नॉन-स्टिक पॅनमध्ये दूध उकळत ठेवा. किसलेले सफरचंद घालून चांगले मिक्स करावे. उकळी आली की ढवळत राहा. त्यात वेलची पावडर आणि शुगर फ्री स्वीटनर घाला. ते चांगले मिसळा आणि थंड होऊ द्या. रेफ्रिजरेट करा आणि ते सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com