Janmashtami Special 2023
Janmashtami Special 2023Saam Tv

Janmashtami Special 2023: जन्माष्टमीला बाळ गोपाळांना पंजिरीचा नैवेद्य का अर्पण केला जातो? कारणं आहे खास

Janmashtami 2023 Tithi : हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते.

Janmashtami 2023 Dhaniya Panjiri :

जन्माष्टमीचा हा सण देशभरात थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते. यंदा हा उत्सव ६ आणि ७ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.

या दिवशी भगवान कृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी संपूर्ण देशात घराघरात आणि मंदिरांमध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तींना सुंदर सजावट केली जाते. लोक आपल्या घरात लहान मुलांना लड्डू गोपाळला सजवतात. त्याची मनोभावे पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, यादिवशी श्रीकृष्णाची पूजा आणि व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात.

Janmashtami Special 2023
Janmashtami 2023 Date : श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? 6 की, 7 सप्टेंबर जाणून घ्या तिथी व शुभ मुहूर्त

ज्योतिष शास्त्रानुसार श्रीकृष्णाचा (Shri Krishna) जन्म जन्माष्टमीच्या रात्री १२ वाजता झाला होता, त्यामुळे रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर उपवास सोडला जातो. या दिवशी लाडू गोपाळांना 56 भोग अर्पण करण्याची परंपरा आहे. यामध्ये पंजिरी हा श्रीकृष्णाचा आवडता पदार्थ आहे. या दिवशी पंजिरी (Panjiri) अर्पण करण्यामागचे खास कारण काय जाणून घेऊया

1. म्हणून पंजिरी अर्पण केली जाते.

बाळगोपाळांना लोणी सोबत कोथिंबीरीची पंजीरी नैवेद्य म्हणून दाखवला जातो. भगवान श्रीकृष्णालाही कोथिंबीरीची पंजीरी खूप आवडते, जी भोगामध्ये वापरली जाते. जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला कोथिंबीर अर्पण केली जाते कारण हा सण पावसाळ्यात साजरा केला जातो.

Janmashtami Special 2023
Shri Krishna Janmashtami 2023 : जन्माष्टमीला या पद्धतीने करा बाळ गोपाळांची पूजा, नियमांचे पालन केल्यास श्रीकृष्ण होईल प्रसन्न

या दरम्यान वात, कफ, पित्त असे अनेक आजार पसरण्याची भीती असते. पावसाळ्यात अशा समस्या झपाट्याने पसरतात, त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कोथिंबीरचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. कोथिंबिरीचे अनेक गुणधर्म आढळतात, जे घशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. कोथिंबीरमध्ये (coriander) रोगप्रतिकारक शक्ती असते. त्यामुळे जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना याचे प्रसाद म्हणून सेवन केले जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com