
Jio Cinema Premium Subscription Plan : जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवे नवे प्लान आणत असते. Jio ने नवीन प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन सादर केला आहे. नवीन प्लॅनमध्ये यूजर्सना खूप मनोरंजक शो पाहायला मिळतील.
अशातच FIFA World Cup आणि IPL 2023 च्या फ्री (Free) स्ट्रीमिंग ऑफर (Offer) करणारे पॉप्युलर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जिओ सिनेमाने युजर्ससाठी फ्री स्बस्क्रिप्शन प्लान लॉन्च केला आहे. जिओ सिनेमाच्या प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लानची किंमत किती असेल त्याचा प्लान कसा असेल व आपल्याला अजून कसे फायदे (Benefits) मिळतील हे जाणून घेऊया
1. Jio Cinema Premium Subscription किंमत (Price)
जिओ सिनेमाच्या प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लानची किंमत ही ९९९ रुपये इतकी आहे.
हा प्लान वर्षभरासाठी असेल असे जिओकडून सांगण्यात आली आहे.
यामध्ये आपण हॉलिवूड चित्रपट हाय क्वॉलिटीमध्ये व्हिडिओ व ऑडिओ पाहू शकतो.
तसेच यामध्ये एकाच वेळी ४ डिव्हाइस आपण कनेक्ट करु शकतो.
2. कसा घ्याल जिओ प्रीमियमचा सबस्क्रिप्शन प्लान
जर तुम्हाला देखील Jio सिनेमाचा हा प्रीमियम प्लान घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला Jio सिनेमाच्या अधिकृत साइट किंवा अॅपवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला सबस्क्राईब करण्याचा पर्याय दिसेल.
तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच, तुम्ही सबस्क्रिप्शन पेजवर पोहोचाल.
जर तुम्हाला हा प्लान खरेदी करायचा असेल तर तुम्हाला Continue वर क्लिक करावे लागेल.
तुम्ही डेबिट, क्रेडिट किंवा UPI द्वारे पेमेंट करू शकता.
सबस्क्रिप्शन खरेदी केल्यानंतर, तुम्ही HBO शो आणि WB चित्रपट इत्यादींचा आनंद घेऊ शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.