
Jio Fiber Recharge : जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमी काही तरी नवीन प्लान आणत असते. अशातच जिओच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. जर तुमच्याकडे जिओच कार्ड असेल आणि तुम्हाला OTT Subscription फ्रीमध्ये हवं असेल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकतात.
तुम्ही Jio Fiber वापरकर्ते असाल तर तुम्ही 599 रुपयांच्या एका रिचार्जमध्ये (Recharge) अमर्यादित डेटा आणि कॉलिंग (Calling) सुविधेचा लाभ घेऊ शकता. यासोबतच 14 OTT अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन (Subscription) दिले जात आहे. या प्लानमध्ये 30 mbps चा हाय स्पीड डेटा देखील मिळत आहे. म्हणजे कॉलिंग डेटा आणि OTT Jio च्या एकाच रिचार्जमध्ये सर्वच काही मिळेल. या रिचार्ज योजनेची अधिक माहीती ही www.jio.com/fiber वेबसाइटवर मिळेल.
Jio Rs 599 हा एक फायबर प्लान आहे. म्हणजे या प्लानमध्ये तुम्हाला 18% GST भरावा लागेल. यात, तुम्हाला 120 रुपयांपेक्षा जास्त कर भरावा लागेल. अशाप्रकारे, या रिचार्ज प्लानची किंमत सुमारे 710 रुपये असेल. याचे बिल तुम्हाला महिन्याच्या शेवटी मिळेल.
1. फायदा कसा होईल?
जिओच्या 599 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड डेटा मिळेल. यामध्ये यूजर्सना 30mbps डाउनलोडिंग आणि अपलोडिंग स्पीड मिळेल. अशा प्रकारे वापरकर्ते त्यांना हवा तेवढा डेटा वापरू शकतात.
तसेच, मोफत कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही दिवसभरातही कॉल करू शकता.
या प्लानची सुविधा म्हणजे यामध्ये तुम्हाला 550 हून अधिक टीव्ही चॅनेल मिळतात.
हा प्लान एका महिन्यात सुमारे 30 दिवसांच्या वैधतेसह येतो.
या प्लानमध्ये वापरकर्त्यांना सुमारे 14 मोफत OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते.
या प्लानमध्ये Disney Plus Hotstar, SonyLIV, Zee5, Voot Select, Voot Kids, Sun NXT, HoiChoi, Discovery +, Uviversal +, Alt balaji, Eros Now, Lionsgate Play, Shemaroome, JioCinema, JioSaavn OTT अॅप्स ऑफर केल्या जात आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.