Jio चा नवीन रिचार्ज प्लॅन! बाकी कंपन्यांपेक्षा 60 रुपये स्वस्त आणि बरच काही...

Jio Recharge Plan: जिओने IPL चा सिझन लक्षात घेऊन नवीन रिचार्ज प्लॅन जारी केला आहे. या प्लॅनमध्ये कंपनी फ्री व्हॉईस कॉलिंग, डेली डेटा आणि Disney + Hotstar सबस्क्रिप्शन देत आहे.
Jio चा नवीन रिचार्ज प्लॅन! बाकी कंपन्यांपेक्षा 60 रुपये स्वस्त आणि बरच काही...
Jio Recharge PlanSaam Tv

Jio Recharge Plan: Jio ने प्रीपेड यूजर्ससाठी (Jio Prepaid Users) नवीन प्लान लाँच केला आहे. कंपनीने 333 रुपयांचा Jio प्लॅन लॉन्च केला आहे, जो विशेषतः क्रिकेट चाहत्यांसाठी आहे. कंपनीने हा रिचार्ज प्लॅन आयपीएल 2022 (IPL 2022) सीझन लक्षात घेऊन लॉन्च केला आहे.

ब्रँडच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन असले तरी नवीन रिचार्ज प्लॅन हा एक सर्वांसाठी परवडणारा पर्याय आहे. Jio च्या या प्लॅनमध्ये Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन, डेटा आणि व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. जाणून घेऊया Jio च्या या प्लॅनची संपूर्ण माहिती.

Jio Recharge Plan
अरेरे! McDonald’s मध्ये रांगेत उभा असताना केलं प्रेमिकेला प्रपोज, पण... (पाहा Viral Video)

Jio Rs 333 Prepaid Plan;

जिओचा हा नवीन प्लॅन 333 रुपयांचा आहे. यामध्ये यूजर्सना तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. लक्षात असुद्या की, या प्लॅनमध्ये कंपनी Disney + Hotstar चे मोबाइल सबस्क्रिप्शन देत आहे. त्याचा मोबाईल प्लॅन 49 रुपये प्रति महिना पासून सुरू होतो.

म्हणजेच या प्लॅनसाठी, 3 महिन्यांसाठी तुम्हाला 147 रुपये खर्च करावे लागतील, जे Jio प्लॅनमध्ये मोफत उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहकांना दररोज 1.5GB हायस्पीड डेटा मिळत आहे. प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. म्हणजेच यामध्ये तुम्हाला एकूण 42GB डेटा मिळतो.

यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची (Unlimited Voice Calling) सुविधाही देण्यात आली आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना तीन महिन्यांसाठी मोफत व्हॉईस कॉलिंग, 1.5 जीबी दैनिक डेटा आणि Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मिळत आहे.

हे देखील पहा-

Disney+ Hotstar चा Free सब्सक्रिप्शन कसे मिळणार?

मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी, ग्राहकांना 333 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह त्यांचा जिओ नंबर रिचार्ज करावा लागेल. रिचार्ज केल्यानंतर, तुम्हाला Disney+ Hotstar अॅपमध्ये साइन-इन करावे लागेल. यानंतर यूजरच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. OTP टाकून साइन-इन (Sign In) ची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. जिओ 333 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह 151 रुपयांचा डेटा अॅड-ऑन पॅक देखील देत आहे. यामध्ये यूजर्सना 8GB डेटा चा अॅड-ऑन मिळेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.