सुट्टीत मुलांना ठेवा व्यस्त वाढणार नाही तुमचा ताण

मुलांची सुट्टी कशी मजेशीर बनवायची आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी कशी उपलब्ध करून द्यायची हे पालकांसमोर आव्हान आहे.
सुट्टीत मुलांना ठेवा व्यस्त वाढणार नाही तुमचा ताण
how to invest your child time in summer vacationब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाळी सुट्टी म्हटलं की, मुलांचा (Child) आनंद गगनात मावत नसतो. इतकंच नाही तर सुट्टीच्या (Holiday) आठवणी मुलांना आयुष्यभर आठवतात. अशा परिस्थितीत मुलांची सुट्टी कशी मजेशीर बनवायची आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी कशी उपलब्ध करून द्यायची हे पालकांसमोर आव्हान आहे. फिरायला जाणे, गावी जाणे आणि खेळायला भेटणे यांसारख्या इतर अनेक गोष्टी करायला मिळतात. ना शाळेत (School) जायचं ना अभ्यासाच टेन्शन त्यामुळे मुलांना उन्हाळ्याची सुट्टी खूप आवडते. परंतु, पालकांना ऑफिस आणि घरामुळे पुरेसा वेळ आपल्या मुलांना देता येत नाही महिनाभर मुलांना कसे सांभाळावे, त्यांच्यावर कोणते योग्य संस्कार करावे किंवा त्यांना कोणत्या गोष्टीत गुतंवून ठेवावे याकडे पालकांचा कल अधिक असतो.

हे देखील पहा -

घरात मुलं कंटाळतील, गडबड होतील याचं अनेक पालक टेन्शनमध्ये असतात. पण जर त्यांनी मुलांच्या सुट्टीचे नियोजन केले आणि त्यांच्या दिनक्रमातही काही फरक केला तर उन्हाळ्याची सुट्टी त्यांच्यासाठी सर्जनशील तर ठरेलच शिवाय त्यांना योग्य वयात खेळ-खेळातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतील उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी या गोष्टी पालकांनी करायला पाहिजे. .

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना अशा प्रकारे व्यस्त ठेवा

१. संपूर्ण वर्षभर उन्हाळ्याच्या सुट्ट्या ही एकदाच असते अशावेळी मुलांना त्यांच्या आवडत्या छंदाशी संवाद साधायला सांगू शकता. यावेळेत मुलांच्या आवडीला प्रोत्साहन मिळू शकते. अशा परिस्थितीत मुलांच्या आवडीनुसार कला, नृत्य, गिटार, ज्युडो, कराटे, स्केटिंग आदी गोष्टींचा विचार पालक करू शकता.

२. वर्षभराच्या व्यस्ततेनंतर, उन्हाळ्याची सुट्टीत आपण फिरायला जाण्याचे किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकडे जावून वेळ घालवू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्ही मुलांना त्यांच्या आजोळी किंवा खास नातेवाईकांच्या घरी १० ते १५ दिवस सोडू शकता. यामुळे त्यांना नातेवाईक आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी बंध निर्माण करण्याची संधी मिळेल.

how to invest your child time in summer vacation
Skin Care : उन्हाळ्यात वाढणाऱ्या पिंपल्सच्या समस्यांना अशा पद्धतीने रोखा

३. उन्हाळा हा स्विमिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम महिना असतो. सुट्टीत मुलांसाठी योग्य कोच निवडून स्विमिंगचे क्लास लावू शकता. तसेच त्यांच्या शारिरीक व मानसिक व्यायामही होईल.

४. उन्हाळी शिबिरात मुलांसाठी खूप मजेदार आणि शिकण्यासाठी नवीन गोष्टी असतात. ही शिबिरे आठवडाभर किंवा ते १५ दिवसांच्या कालावधी इतकी असते त्याचा मूल खूप आनंद घेऊ शकते.

अशाप्रकारे मुलांना तुम्ही उन्हाळयाच्या सुट्टीत व्यस्त ठेवू शकता.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.