
Children Care Tips : मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालक मुलांकडे भरपूर लक्ष देत असतात. त्यामुळे मुलांचे वय 3 ते 4 वर्ष असताना, मुलांच्या शिक्षणासाठी पालक त्यांना प्ले ग्रुपमध्ये टाकायचा विचार करतात. कारण प्ले ग्रुपमध्ये मुले खेळण्यासोबतच अनेक नवीन गोष्टी शिकतात.
अशा परिस्थितीत तुम्ही देखील मुलांना प्ले ग्रुपमध्ये टाकायचा विचार करत असाल तर शाळा निवडण्यासाठी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहू शकता. प्ले ग्रुपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मुले (Children) पहिल्यांदाच पालकांपासून (Parents) दूर जातात.
त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेची काळजी पालक असते. म्हणून मुलांसाठी प्लेग्रुप निवडण्याचे मार्ग आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.ज्याच्या मदतीने तुम्ही मुलांच्या सुरक्षितता सुनिश्चित करू शकता आणि मुलांची मेंटल ग्रोथही जलद गतीने होऊ शकते.
शाळेला भेट द्या -
मुलांचे प्ले ग्रुपमध्ये ऍडमिशन करण्याआधी तुम्ही जवळपासच्या काही शाळांना भेट देऊ शकता. विशेषतः ऍडमिशनच्या काळात अनेक प्ले ग्रुप पालकांना आमंत्रित करतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्या प्ले ग्रुपला भेट देऊन मुलांसाठी सर्वोत्कृष्ट शाळाची निवड करू शकता.
इतर पालकांना विचारा -
मुलांसाठी शाळा निवडताना तुम्ही त्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना शाळेविषयी विचारू शकता. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या पालकांकडून शाळेत मिळणाऱ्या सोयी सुविधा, शालेय शिक्षण आणि शिक्षकांशी संबंधित माहिती मिळवू शकता.
इंटरनेटची मदत घ्या -
काही प्ले ग्रुप शॉर्टलिस्ट करा आणि इंटरनेट किंवा इतर माध्यमातून तुम्ही त्या प्ले ग्रुपबद्दल अधिक माहिती गोळा करा. इंटरनेटवर उपलब्ध फीडबॅक तुम्हाला मुलांसाठी प्ले ग्रुप निवडायला मदत करू शकतात.
नोंदणीसाठी उशीर करू नका -
प्रसिद्ध प्लेग्रुपमध्ये आपल्या मुलांनचे ऍडमिशन करण्यासाठी पालकांच्या लांबच लांब रांगा दिसतात. अशा परिस्थितीत, नोंदणी उशिरा झाल्यास तुमच्या मुलाचे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट केले जाऊ शकते. म्हणून प्ले ग्रुप निवडल्यानंतर लगेचच मुलांच्या नावाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. परिणामी मुलांच्या प्रवेशात कोणतेही अडथळे येणार नाहीत.
प्ले ग्रुपचे नियम जाणून घ्या -
मुलांसाठी प्ले ग्रुप निवडताना तुम्ही शाळेत फेरफटका मारू शकता. त्यामुळे तुम्हाला शालेय वातावरण आणि अभ्यासाशी संबंधित माहिती मिळते. तसेच शाळेचे नियम आणि कायदे जाणून घेऊन तुम्ही स्वतःला टेन्शन फ्री ठेवू शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.