परदेशात शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्याला अनेक संधी मिळतात.
before applying for a scholarship abroad
before applying for a scholarship abroadब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : परदेशात उच्च शिक्षण घेणे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांचे स्वप्न आहे. काहीचे स्वप्न पूर्ण होते तर काहींचे अपूर्ण राहाते. परदेशात उच्च शिक्षण (Education) घेण्यासाठी आपल्याला अनेक संधी मिळतात.

हे देखील पहा -

उच्च शिक्षणाच्या जितक्या अधिक संधी मिळत असतात तितकेच अधिक ते महाग असते. परदेशात शिक्षण घेण्यासाठी उत्तम नियोजनाची व ज्ञानाची आवश्यकता असते. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणे हे सामान्य असले तरी, त्याचे नियोजन करायला हवे. शिष्यवृत्तीचा विचार करताना आपल्याला अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.

या गोष्टींचा विचार करुन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा-

१. शिष्यवृत्ती (scholarship) मिळवण्यासाठी आपल्याला शैक्षणिक ताकदीची आवश्यकता असते. जर आपण पदवी करण्याचा विचार करत असू तर आपला जेपीए हा ७ पेक्षा अधिक असायला पाहिजे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना आपण लक्षात ठेवायला हवे की, आपली प्रोफाइल अधिक मजबूत असायला हवी. यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त आपण खेळ, संगीत, नाटक आदी उपक्रमांचा तपशील जरूर लिहावा.

before applying for a scholarship abroad
मुलांची ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

२. केवळ विद्यापीठेच नाही तर इतर अनेक परदेशी संस्था शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देतात. या शिष्यवृत्ती सरकारी तसेच खाजगी संस्थांद्वारे दिल्या जातात. आपण परदेशात असल्यास देश परदेशी विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती योजनांवरही काम करतात. या शिष्यवृत्तींची माहिती दोन्ही देशांच्या शिक्षण विभागांकडून आपल्याला मिळू शकते.

३. आपल्याला जो कोर्स करायचा आहे तो सुरू होण्याच्या १८ महिने आधी तुम्ही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करावी. कारण अर्ज केल्यानंतर तो सादर करण्यासाठी आणि त्याची पडताळणी करण्यासाठी बराच वेळ लागतो. अशावेळी आपल्याला शिष्यवृत्तीही वेळेवर मिळेल आणि अभ्यासक्रमात कोणतीही अडचण येणार नाही.

४. अर्ज भरल्यानंतर त्याचे पुनरावलोकन करणे अत्यंत आवश्यक आहे. पुनरावलोकन केल्यास अर्जातील उणिवा उघड होतील आणि आपल्याला त्या दुरुस्त करता येतील. आपला अर्ज (Application) आपल्या जवळच्या किंवा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तिला पडताळून पाहाण्यास सांगा.

५. अर्ज करताना आपण आपल्याबद्दल जे खरे आहे तेच लिहण्याचा प्रयत्न करा. त्यात आपल्याबद्दल प्रामाणिकपणे लिहा. आपली कौशल्ये, आवड इत्यादींबद्दल लिहा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com