किडनीचा विकार असलेल्या रुग्णांनी ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा

रक्त शुद्ध करण्याचे कार्य किडनी करते.
किडनीचा विकार असलेल्या रुग्णांनी ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा
किडनीचा विकार असलेल्या रुग्णांनी ‘या’ पदार्थांचे सेवन टाळाSaam Tv

देशातील अनेक लोक हे उच्च रक्तदाब High blood pressure आणि डायबेटिस Diabetes या आजारांनी पीडित आहेत. त्यामुळे किडनी Kidney विकारांचा धोका देखील वाढला आहे. शरीराची काळजी न घेतल्यामुळेच हा विकार उद्‌भवतो. मानवाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव हा किडनी आहे. आपल्या किडनीवर थोडी जरी समस्या आली तरी आपल्या शरीरातील कार्य प्रणालीवर याचा मोठा परिमाण होत असतो. कारण रक्त शुद्ध करण्याचे कार्य किडनी करते.

किडनीचा शरीरातील इतर अवयवांच्या कार्याशीही संबंध असतो. जर आपल्याला डायबेटिस आणि उच्च रक्तदाब असेल तर या आजारांचा परिणाम किडनीवर होऊ शकतो. यामुळे जर आपण खाण्या-पिण्याकडे नीट लक्ष दिले नाही तर किडनीच्या अनेक समस्या होऊ शकतात.

हे देखील पहा -

किडनीची समस्या असल्यास ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा

– मिठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने किडनी खराब होण्याचा धोका अधिक निर्माण होतो आणि किडनी स्टोन होण्याची भीती असते.

– आहारात बटाट्याचे सेवन करू नये.

– टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते जे किडनीला हानी पोहोचवू शकते त्यामुळे टोमॅटोचे जास्त सेवन करू नये.

– दुधापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत. यात फॉस्फरस, पोटॅशियम आणि प्रथिने अधिक प्रमाणात असल्याने किडनीला त्रास होऊ शकतो.

किडनीचा विकार असलेल्या रुग्णांनी ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा
लस घेतलेल्यांसाठी भरघाेस सवलत; काेल्हापूरात दुकाने सुरु

– केळीचे सेवन करू नका. केळीत पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते, जे किडनीसाठी हानिकारक ठरू शकते.

– सोडा किंवा शीतपेयचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळा.

– ब्रेडचे सेवन करणे टाळावे.

- जास्त सोडिअम असलेल्या अन्नचे सेवन करणे टाळा.

– ब्राऊन राईसचे अतिसेवन किडनीसाठी हानिकारक ठरू शकते.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com