Kids Health care : मुलांमध्ये या प्रकारच्या समस्या दिसत आहे ? असू शकतो गंभीर आजार, वेळीच व्हा सावधान

मुलांमध्ये या समस्या दिसल्यास वेळीच सावध व्हा.
Kids health tips, Parenting tips
Kids health tips, Parenting tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बाळ जन्माला आल्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्याची आपआपल्या परिने काळजी घेत असतो. बाळ जस जसे मोठे होत जाते तस तसे त्याला समजू लागते.

हे देखील पहा -

बाळ (Baby) लहान असताना आपण त्याच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याची बघण्याची स्थिती, हातापायाची हालचाल, भूक लागल्यानंतर रडण्याची पध्दत किंवा अंगठा चोखण्याची पध्दत अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला समजत नाही. मुल जस जसे मोठे होऊ लागते त्यानंतर आपल्याला गोष्टी हळूहळू उलगडू लागतात. त्यामुळे वेळीच आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे हे जाणून घेऊया.

१. सामान्यत: दोन वर्षांच्या आतील बाळांच्या पायाचा तळवा चपटा असतो. त्यानंतर हळूहळू चरबी कमी होते आणि नैसर्गिकरित्या गोल आकार प्राप्त होतो. जर दोन वर्षांनंतरही बाळाचे पाय चपटेच असतील, तर डॉक्टरांना अवश्य भेटा. चपट्या पायांना ओळखण्यासाठी मुलांना दोन्ही पायांवर उभं करा. जिथे पायाचे दोन्ही पंजे एकमेकांना जोडले जातात, गोलाकार दिसतो. याचा अर्थ पाय सामान्य आहेत. पाय जर प्रत्येक दिशेत सहजपणे फिरत असतील, तर याचा अर्थ आहे की, पायाशी संबंधित , कोणताही विकार नाही.

Kids health tips, Parenting tips
Heart attack sign : हृदयविकाराचा झटका आपल्याला कानातून कसा जाणवू शकतो ? त्याबद्दल जाणून घेऊया

२. मुलांना पंजावर जोर देत रोज दहा मिनिटं चालायला सांगा. यामुळे पायांना नैसर्गिक आकार मिळण्यास मदत होईल. मुलांना पायाच्या बोटाच्या मदतीने जमिनीवर पडलेली पेन्सिल उचलण्यास सांगा. उभं राहताना मुलांना पायाच्या बाह्य कडांवर जोर देत उभं राहण्यासाठी प्रेरीत करा. हे उपाय आजमाविल्यानंतरही मुलांच्या पायात विकृती आढळली, तर डॉक्टरांची मदत घ्या. एका विशिष्ट प्रकारे बनलेले शूज पायासाठी फायदेशीर ठरतात.

३. अंगठा किंवा बोट चोखण्याची सवय अनेक लहान मुलांना असते. ही सवय जन्माला आल्यानंतर काही दिवसांनंतर लागते. दोन वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये ही सवय नैसर्गिक समजून तिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. मूलाला भूक लागल्यानंतर, थकल्यानंतर, झोपताना किंवा दात निघण्यापूर्वी अनेकदा बोट किंवा अंगठा चोखते. या सवयीस मुलांवरील (Child) मानसिक दबावाचे प्रतीक म्हणूनही बघितले जाते. वय वाढते तसे अंगठा चोखण्याची सवय कमी होते. जर ही सवय दोन वर्षांनंतरही सुरु राहिली तर मात्र मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो.

४. अंगठा चोखण्याच्या सवयीमुळे दातांचा विकार आणि त्यांचा योग्य आकार यावर परिणाम होतो. वरील आणि खालील दात एकमेकांसमोर न येता एकमेकांच्या आत घुसतात. ही सवय वर्षानुवर्षे सुरु राहिली, तर वरील जबड्याचे दात समोर येऊन व्यंग निर्माण होते. अशाचप्रकारे अंगठा लांब होणे, चेहऱ्याची असमान वृध्दी, पोटात जंत किंवा अपचन आणि कधी कधी विषारी वस्तू पोटात जाणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com