
आजकाल घड्याळ घालणे हे गरजेसोबत फॅशनसाठीही वापरले जाते. सध्या घड्याळात वेगवेगळे प्रकार आले आहेत. स्मार्टवॉच हे सध्या खूप जास्त ट्रेडिंगला आहे. अनेक लोक स्मार्टवॉचचा वापर करतात. आज आम्ही तुम्हाला लहान मुलांसाठीचे समार्टवॉचचे पर्याय सांगणार आहोत.
सध्या समार्टवॉच हे सगळ्यांकडेच पाहायला मिळते. त्यात वेगवेगळे रंग, फिचर्स पाहायला मिळतात. फॅशनबरोबरच स्मार्टवॉचचे फायदेही आहेत. स्मार्टवॉचने आपण फिटनेसवर लक्ष ठेवू शकतो. त्याचबरोबर स्मार्टवॉच आपल्या मोबाईलशी कनेक्ट होते. हे स्मार्टवॉच फक्त मोठ्या व्यक्तींसह लहान मुलांसाठीही तयार करण्यात आले आहे.
Apple Watch SE
अॅपल वॉच एसई हे स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध आहे. या वॉचमध्ये खास पॅरेंट कंट्रोल फिचर देण्यात आले आहे. या फिचरमुळे पालक हे स्मार्टवॉच कंट्रोल करु शकतात. हे घड्याळ आयफोनसोबत कनेक्ट केले जाऊ शकते. यावर तुम्ही वॉईस कॉल करु शकतात.हे वॉच तुम्हाला 29,600 रुपयांमध्ये मिळेल.
Fitbit Ace 3
Fitbit Ace 3 स्मार्टवॉचमध्ये फिटनेस ट्रॅकर देण्यात आला आहे. यासोबतच घड्याळात ८ दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी देण्यात आली आहे. हे घड्याळ तुम्ही 12,000 रुपयांना खरेदी करु शकता. Fitbit Ace 3 वॉचमध्ये स्लीप ट्रँकिग, आरोग्याच्या रोजच्या सवयींमधील बदल लगेच डिटेक्ट होतात.
Sekyo S1
Sekyo S1 या वॉचमध्ये GPS आहे. त्याचबरोबर हे घड्याळ 2G नेटवर्कसह येते. यामुळे तुम्ही व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करु शकता. हे वॉच 90 मीटरच्या आजूबाजूचे रिअल टाइम ट्रँकिंग करते. हे घड्याळ फक्त 2,476 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Watchout Smartwatch
वॉचआउट स्मार्टवॉचमध्ये 4G LTE नेटवर्क देण्यात आले आहे. यामुळे तुम्ही वॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉल करु शकता. या स्मार्टवॉचमध्ये डिस्पलेसह 2MPचा कॅमेराही देण्यात आला आहे. मुलांनी हातातून घड्याळ काढल्यास, मुलगा शेवटी कुठे होता याचे नोटिफिकेशन पालकांना मिळेल. हे घड्याळ 9,174 रुपयांना उपलब्ध आहे.
Noise scout
Noise scout या स्मार्टवॉचमध्ये एक सिम स्लॉट आहे. जो 4G Lite कनेक्टिव्हीटीला सपोर्ट करतो. तुम्ही Noise scout स्मार्टवॉचद्वारे व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉलही करु शकता. याशिवाय या घड्याळात SOS बटण देण्यात आले आहे. जे पालकांना मुले कोणत्या ठिकाणी आहेत हे सांगते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.