Drinking Water Benefits : सकाळी पाणी पिण्याचे आरोग्याला अनेक फायदे, जाणून घ्या

Hydrate Your Body : निरोगी जीवनशैलीसाठी आपले शरीर हायड्रेटेड राहणे फार महत्वाचे आहे.
Drinking Water Benefits
Drinking Water BenefitsSaam Tv

Benefits Of Water : आरोग्य निरोगी राहण्यासाठी शरीराला पाण्याचा आवश्यकता असते. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. अन्यथा शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता, डोकेदुखी, कोरडी त्वचा,कमी रक्तदाबाचा धोका,अपचन, लठ्ठपणा, सांधेदुखी आणि स्तनाचा कर्करोग अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात.

या समस्या टाळण्यासाठी किंवा निरोगी जीवनशैलीसाठी (Lifestyle) आपले शरीर हायड्रेटेड राहणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रोज किती प्रमाणात पाणी प्यायला हवे आणि त्याने आपल्या आरोग्याला होणारे फायदेही सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया याविषयी संपूर्ण माहिती.

Drinking Water Benefits
Plastic Water Bottle Side Effects : तुम्हाला सुद्धा प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिण्याची सवय आहे ? जडू शकतो गंभीर आजार

1. पचनसंस्था निरोगी राहते

रिकाम्या पोटी किंवा तुम्ही जर उपवास ठेवला त्यावेळेस पाणी प्यायले तर तुमचा मेटाबॉलिक रेट वाढू शकतो. पचनसंस्था सुधारते आणि पचनसंस्थेसंबधित समस्याही दूर होतात. तसेच बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्याही दूर होतात.

2. वजन कमी करण्यासाठी

भरपूर पाणी प्यायल्याने आपली भूक कमी होते. परिणामी वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी पियायचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने लघवीसोबत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात पचनक्रिया सुधारते. परिणामी वजन कमी (Weight Loss) होते

Drinking Water Benefits
Barley Water Benefits : इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल 'हे' बूस्टर ड्रिंक!

3. ऊर्जा वाढवण्यासाठी

तुम्हाला जर थकवा, अशक्तपणा सतत जाणवत असेल तर भरपूर पाणी पिने तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. कारण शरीरातील पाण्याच्या कमरतेमुळे बऱ्याचदा थकवा जाणवतो. त्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. जेणेकरून शरीराला ऊर्जाही मिळेल.

4. तणाव कमी करण्यासाठी

तुम्हाला माहित आहे का, मेंदूच्या सुमारे 70 ते 80 टक्के ऊती पाण्याने बनलेल्या असतात. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिले नाहीतर डिहायड्रेशनमुळे शरीरासोबतच मेंदूवर देखील तणाव निर्माण होतो.

Drinking Water Benefits
Drinking Water Before Brushing In The Morning : सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे, फक्त ही चूक करू नका!

5. केसांचे सौंदर्य सुधारेल

शरीरातील पाण्याक्या कमतरतेमुळे केस पातळ आणि नाजूक होतात. त्यासोबतच कोरडेपणा आणि केस गळण्याच्या समस्याही निर्माण होतात. या समस्या दूर करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि केस मजबूत होऊन केसांची वाढ जलद गतीने होते.

6. सकाळी आणि दुपारी किती पाणी प्यावे?

  • सकाळी उठल्यानंतर लगेच कमीत कमी ३ कप प्यावे. लक्षात ठेवा की तुम्ही दररोज एवढे पाणी पिणे गरजेचे आहे.

  • तसेच जेवणानंतर एक तासापर्यंत पाणी पिणे टाळा. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यानंतर 45 मिनिटांनी नाश्ता करा आणि त्याआधी काहीही खाणे टाळा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com