
मुंबई : हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) या सणाला अनन्यसाधारण महत्व असून अक्षय तृतीया ही एक महत्वाची तिथी मानली जाते. अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील चार सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक असून या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही मुहूर्ताशिवाय करता येते. लग्न कार्य, गृहप्रवेश किंवा मुंडन असे अनेक शुभ कार्यक्रम आजच्या दिवशी मुहुर्त न बघता केले जाऊ शकतात. विशेषत: अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचीही पद्धत आहे. तसंच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी केले तर लक्ष्मीची कृपा त्या व्यक्तीच्या जीवनावर कायम राहते असं म्हणतात. (Akshaya tritiya 2022 shubh muhurat)
हिंदू (Hindu) पंजागानुसार अक्षय तृतीया हा सण ३ मे २०२२ रोजी म्हणजेच आज (मंगळवार) साजरा केला जाईल. हिंदू धर्मात अक्षय तृतीयेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख-समृद्धी मिळते तसंच धर्मग्रंथानुसार भगवान परशुरामाचा जन्म देखील याच दिवशी झाला होता.
आजचे मुहूर्त -
हे देखील पाहा -
मंगळवार, ३ मे २०२२ रोजी अक्षय तृतीया -
अक्षय तृतीया पूजनाचा मुहूर्त - सकाळी ५ वाजून ५९ मिनिट ते दुपारी १२ वाजून
26 मिनिटांपर्यंत आहे.
कालावधी - ६ तास २७ मिनिटे असून मंगळवार दिनांक ३ मे सकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी तृतीया तिथी सुरू होतेय, तर ४ मे सकाळी ७ वाजता तृतीया तिथी संपतेय.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठीची वेळ
३ मे सकाळी ५ वाजून ५९ मिनिट ते ४ मे सकाळी ५ वाजेपर्यंत खरेदी करण्यासाठीचा मुहूर्त असेल.
अक्षय तृतीया दिवशीची पूजन पद्धत -
आजच्या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे कपडे घालावेत. यानंतर धूप आणि तुपाचा दिवा लावून पिवळ्या आसनावर बसावं. तसंच आजच्या दिवशी विष्णु सहस्रनाम, विष्णु चालीसा म्हणावी तसंच विष्णूंची आरती देखील करावी. यासह जर पूजा करणाऱ्यांने एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास दे देखील चांगले मानले जाते.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.