Maharashtra's Honeymoon Spot: हनीमूनसाठी बेस्ट ठरतील महाराष्ट्रातील 'ही' 5 पर्यटनस्थळे, जाणून घ्या

Honeymoon Travel Place in Maharashtra : तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत हनिमून साजरा करायला जाऊ शकता.
5 Honeymoon Travel Place in Maharashtra
5 Honeymoon Travel Place in MaharashtraHoneymoon Travel Place in Maharashtra To Visit- Saam Tv

Honeymoon Travel Place :

लग्न झालेल्या नवीन जोडप्यांना जर हनिमून साजरा करायचा असेल तर ते वेगवेगळया देशांमध्ये वेगवेगळया ठिकाणी आपला कॉलिटी टाईम एकत्र घालवण्यासाठी जातात. अशातच महाराष्ट्रामध्ये एकापेक्षा एक अशी पर्यटनस्थळ आहेत.

जिथे तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत हनिमून साजरा करायला जाऊ शकता. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सौंदर्यबद्दल सांगायचे झाले तर, महाराष्ट्र हे राज्य डोंगरदऱ्यांनी, धबधब्याचे, हिरव्यागार गवताने बहरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रामधील अशा काही खास ठिकाणी हनीमून साजरी करण्यासाठी येऊ शकता. जेणेकरून तुमच्या या मखमली दिवसांतील आठवणी तुमच्या स्मरणात राहतील.

5 Honeymoon Travel Place in Maharashtra
Kedarnath Yatra Travel Guide: केदानाथला जाणे झाले सोपे ! बजेटमध्ये कसा करता येईल प्रवास? जाणून घ्या सविस्तर

1. माहिती: लोणावळा:

Lonavla Honeymoon Destination
Lonavla Honeymoon DestinationLonavla - canva

लोणावळा हे पर्यटन स्थळ मुंबईच्या (Mumbai) जवळ आहे. लोणावळा अतिशय निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. लोणावळ्यामध्ये डोंगर, दऱ्या, धबधबे, आणि महत्त्वाचं म्हणजे लोणावळा चिक्की ही अतिशय लोकप्रिय आहे. अनेक लोक सुट्टीच्या दिवशी किंवा व्हेकेशनला लोणावळा येथे फिरायला येतात. लोणावळ्यामध्ये घनदाट जंगले, लेण्या आणि निसर्गरम्य धबधबे आहेत. अशातच या वातावरणामध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरला (Partner) घेऊन मजा करण्यासाठी येऊ शकता. लोणावळ्याची प्राकृतिक रचना अतिशय नयनरमी आहे. एवढचं नाही तर लोणावळ्यामध्ये अनेक देवस्थान देखील आहेत. फिरायला गेल्यावर तुम्ही तेथील देवस्थानांना देखील भेट देऊ शकता. असं केल्याने तुमचे दर्शन देखील होईल आणि तुमची पिकनिक देखील होईल.

2. कोलाड :

Kolad Honeymoon Destiation
Kolad Honeymoon DestiationKolad Honeymoon Destiation - Canva

कोलाड हे महाराष्ट्रमधील (Maharashtra) सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. कोलाड हे पर्यटन स्थळ व्हाईट रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. यासोबतच येथे हिरवीगार जमीन, मोठी मोठी मैदाने, रॅपलिंग यांसारख्या जागा उपलब्ध आहेत. हे पर्यटनस्थळ कपल्ससाठी अतिशय मजेशीर आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोलाडचे सौंदर्य आणखीनच उभारून येते. त्याचबरोबर कोलाड येथे मोठमोठे धबधबे, डोंगरे, धरणे अशा विविध निसर्ग (Nature) सौंदर्याने नटलेले हे ठिकाण आहे.

3. अलिबाग :

Alibaug Honeymoon Place
Alibaug Honeymoon PlaceAlibaug Honeymoon Place - Canva

अलिबाग हे पर्यटन स्थळ त्याच्या मोठ्या समुद्रांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर इथे सुंदर दृश्य, वीला यांसारख्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पार्टनरला घेऊन अलिबाग येथे येऊ शकता. त्याचबरोबर अलिबाग येथे कुलाबा किल्ला आहे. अलिबागला मिनी गोवा म्हणून ओळखले जाते. तुम्ही तुमच्या फॅमिली (Family) सोबत देखील अलिबागला पिकनिकसाठी येऊ शकता. त्याचबरोबर कप्लस त्यांच्या हनीमून पॅकेजमध्ये अलिबाग हे डेस्टिनेशन निवडू शकतात.

4. रत्नागिरी :

Ratnagiri Honeymoon Destination in Maharashtra
Ratnagiri Honeymoon Destination in MaharashtraRatnagiri Honeymoon Destination in Maharashtra - Canva

रत्नागिरी हे शहर त्यांच्या मोठमोठ्या डोंगरांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर येथे जंगल, धबधबे , डोंगरे आहेत. तुम्ही हनीमूनसाठी बेस्ट डेस्टिनेशन म्हणून रत्नागिरी हे शहर निवडू शकता. त्याचबरोबर रत्नागिरी येथे मोठमोठे हॉटेल उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही फिरता फिरता स्वादिष्ट व्यंजनांचा देखील आस्वाद घेऊ शकता.

5. औरंगाबाद :

Places To Visit in Aurangabad
Places To Visit in Aurangabad Places To Visit in Aurangabad - Canva

औरंगाबाद हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक केंद्रासाठी ओळखले जाते. अशातच औरंगाबाद येथील रेशमी आणि सुती कपड्यांची चर्चा पूर्ण जगभर पसरलेली आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जवळ अजिंठा आणि एलोरा या गुफा आहेत. तुम्ही तुमचा ओकेशन प्लॅन करण्यासाठी औरंगाबाद हे शहर निवडू शकता. औरंगाबाद येथे अनेक पर्यटक वेगवेगळ्या शहरांमधून भेट द्यायला येतात. त्याचबरोबर औरंगाबाद येथे बीबी का मकबरा आहे. हा बीबी का मकबरा हुबेहूब ताजमहाल सारखा दिसतो. परंतु तो ताजमहाल नाही आहे. औरंगाबाद येथे हिमायत बाग, सलीम अली झील पाहण्यासाठी लोक येतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com