Aadhar-PAN Link Last Date Extension: आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली, सरकारने दिली अवघ्या काही दिवसांची मुदत, ही वेळ चुकवू नका

Aadhar-PAN Link Update : आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च ते 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
Aadhar-PAN Link Last Date Extension
Aadhar-PAN Link Last Date ExtensionSaam Tv

Aadhaar-PAN Link Last Date : आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च ते 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधीही पॅन-आधार लिंकिंगची अंतिम तारीख दोनदा वाढवण्यात आली आहे.

सर्वप्रथम, पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 होती. प्रथमच ती 30 जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर ही मुदत पुन्हा 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली.

पहील्यांदा शेवटची तारीख वाढवल्यानंतर 500 रुपये दंड आकारण्यात आला. पुढच्या वेळी ते 1000 रुपये करण्यात आले. यावेळी पॅनशी आधार लिंक केल्यास किती दंड (Penalty) आकारला जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सरकारी आदेशानुसार, 1 जुलै 2017 पूर्वी बनवलेली सर्व पॅन कार्डे आयकर कायद्याच्या कलम 139AA अंतर्गत आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये सरकारने संसदेत सांगितले की 46,70,66,691 लोकांनी आधार कार्ड पॅनशी लिंक केले आहे. तथापि, देशातील एकूण 61,73,16,313 लोकांना पॅन कार्ड जारी करण्यात आले आहे.

Aadhar-PAN Link Last Date Extension
Aadhar-Pan Link : तुमच आधार - पॅन कार्डशी लिंक आहे की नाही, कसे ओळखाल ?

पॅन-आधार का लिंक करावे -

सरकारला प्रत्येक पॅनकार्ड एका विशिष्ट क्रमांकाने लिंक करावे असे वाटते. आधारशी लिंक केल्यानंतरच हे शक्य होईल. कर हेराफेरी कमी करणे हा त्यामागचा उद्देश आहे. अनेकदा लोक (People) डुप्लिकेट पॅन कार्डच्या माध्यमातून करचोरी करतात. आधारशी लिंक केल्यानंतर, असे करणे जवळजवळ अशक्य होईल.

Aadhar-PAN Link Last Date Extension
Aadhaar Pan Link Status : 31 मार्चच्या आधी तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही बघाच.. अन्यथा भरावा लागेल 10,000 रुपये दंड

पॅनला आधारशी कसे लिंक करावे -

  • सर्वप्रथम आयकर वेबसाइटवर जा.

  • यानंतर 'लिंक आधार' वर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला लॉगिन करण्यास सांगितले जाईल.

  • तुमची जन्मतारीख पॅन क्रमांक आणि वापरकर्ता आयडी सोबत टाका.

  • आधार कार्डवर असलेली जन्मतारीख टाका.

  • यानंतर तुमच्या खात्याच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा.

  • येथे आधार कार्ड लिंकचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • आता आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.

  • तुम्हाला खाली आधार लिंकचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

  • यानंतर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले जाईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com