Govt Policy For EV: इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताय ? आधी केंद्र सरकारचा नवा नियम वाचा, तुमच्या खिशाला बसणार कात्री

What is Central Government Policy for EV : डाउनपेंमेंट, ईएमआय सारख्या गोष्टींवरुन आपण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याच्या विचारही करतो.
Electric Vehicle Buyers
Electric Vehicle BuyersSaam Tv

What is the New Policy of EV Vehicles : आपल्या प्रत्येकाला असे वाटते की, आपल्या दारात निदान एकतरी गाडी उभी असावी. त्यासाठी आपण अनेक कष्ट करतो. डाउनपेंमेंट, ईएमआय सारख्या गोष्टींवरुन आपण ती खरेदी करण्याच्या विचारही करतो. जर तुम्ही देखील येत्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आधी ही बातमी वाचा.

केंद्र सरकारने इलेक्ट्रिक (Electric) वाहनांवरील FAME-2 अनुदान कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार 2 व्हीलर फेम-2 सबसिडी 33 टक्क्यांपर्यंत कमी केली जाऊ शकते. असे झाले तर येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहने खरेदी (Buy) करणे अधिक महाग होऊ शकते.

Electric Vehicle Buyers
Bike Engine Oil Tips: बाईकचे इंजिन ऑइल कधी बदलायचे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा बसेल पैशांचा फटका !

FAME ची सबसिडी कमी केल्यास, दुचाकी सेगमेंटमधील इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती 35 ते 40 टक्क्यांनी वाढू शकतात. म्हणजेच येत्या काळात इलेक्ट्रिक वाहने महाग होऊ शकतात. असे झाल्यास त्याचा परिणाम इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीवर दिसेल.

FAME-2 योजनेंतर्गत अनुदान 15,000 रुपये प्रति किलोवॅटवरून 10,000 रुपये प्रति किलोवॅटपर्यंत कमी करण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. असे झाल्यास त्याचा थेट परिणाम हा इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवर होऊ शकतो. सध्याचे 15000 प्रति किलोवॅट किंवा MRP च्या 40% साधारणपणे आहे. हे 10000 प्रति KW किंवा MRP च्या 15% पर्यंत बदलू शकते.

Electric Vehicle Buyers
Royal Enfield : 'या' 5 कारणांमुळे विकत घेऊ नका बुलेट, लाखो रुपये जातील पाण्यात...

1. इलेक्ट्रिक वाहने होतील का महाग ?

FAME सबसिडी कमी झाल्यामुळे इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या किमती 35% ते 40% पर्यंत वाढू शकतात. सबसिडी कमी झाल्यामुळे TVS मोटर आणि HERO च्या इलेक्ट्रिक डिव्हिजनवर सगळ्यात मोठा परिणाम होऊ शकतो. सध्या सर्वात महाग टू-व्हीलर भारतात (India) आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com