
New Regulation For Gold Buying: सोनं खरेदी करताना त्यामध्ये २२ कॅरेट, २४ कॅरेटच्या शुद्धतेचे ग्राहकांना विकले जाते. रोजच्या बदलणाऱ्या किमतीत सोनं ग्राहकांच्या विक्रीला येते. सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग संबंधित भारतीय मानक ब्यूरो (BIS)ने नियमांत बदल केले आहेत.
1. एक एप्रिलपासून लागू करण्यात आलेले नवे हॉलमार्किंग नियम
ज्वेलर्स असोसिएशनकडून भारतीय मानक ब्यूरोला सतत करण्यात आलेल्या मागणीनंतर 1 एप्रिल पासून हा नियम (Rules) देशातील 288 जिल्ह्यातील सोन्याच्या दागिन्यांवर 6 अंकी हॉलमार्किंग नियम लागू करण्यात आला आहे. Hallmark Unique Identification(HUID)वर BIS Care App मध्ये आयडी क्रमांक टाकून आपण खरेदी केलेल्या दागिन्याबद्दल आणि त्या ज्वेलरबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता.
2. दागिने विक्रेत्यांना येणाऱ्या समस्या
हे नियम लागू झाल्यानंतर दागिने विक्रेत्यांना अनेक अडचणींचे सामना करावा लागत आहे. ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार छोट्या आणि किरकोळ ज्वेलर्सकडून जेव्हा एखादा ग्राहक दागिना खरेदी करतो तेव्हा त्या दागिन्यावर त्याचे नाव हॉलमार्किंगवर दिसत नाही. यामुळे ग्राहकांची विश्वासाहृयता कमी होते. अशा परिस्थितीत ग्राहक किरकोळ विक्रेत्यांकडून थेट मोठ्या विक्रेत्यांकडे वळताना दिसून येत आहेत.
3. छोट्या-किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम
ग्राहक जेव्हा दागिने खरेदीसाठी थेट घाऊक विक्रेते किंवा मोठ्या उत्पादकांकडे वळतात तेव्हा छोट्या व किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर वाईट परिणाम होतो. याचे कारण म्हणजे अनेक किरकोळ विक्रेते आपल्या दुकानासाठी सामान मोठ्या उत्पादकांकडून विकत घेतात. विकत घेतलेल्या दागिन्यांवर मोठ्या उत्पादकांचे नाव असते. परंतु जेव्हा किरकोळ विक्रेते हे दागिने विकतात तेव्हा त्यावर त्यांचे नाव येत नाही. मागील महिन्यात ज्वेलर्स असोसिएशनकडून ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या सचिवांसोबत झालेल्या बैठकीत या समस्येला मांडण्यात आले होते.
4. BIS Care वर मिळणार सविस्तर तपशील
या सर्व प्रकरणानंतर भारतीय मानक ब्यूरोने BIS Care App वरुन ज्वेलर्सचे नाव काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या बदलांनंतर BIS Care App वर 6 अंकी HUID क्रमांक टाकल्यावर ज्वेलरचा परवाना क्रमांक, हॉलमार्किंग केंद्राचे नाव, नोंदणी क्रमांक, पत्ता, दागिन्याचा प्रकार, हॉलमार्किंगची तारीख आणि सोन्याची शुध्दता एवढेच दिसणार आहे. म्हणजेच ज्वेलरचे नाव सोडल्यास दागिन्यांबद्दलची सर्व माहिती मिळणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.