१५ वर्षीय अल्पवयीन मुलीचं १७ वर्षीय मुलासोबत लावलं लग्न; आता आली पश्चातापाची वेळ

दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी (३ मे) चाकूर तालुक्यातील घरणी येथे एक बालविवाह होत असल्याची तक्रार 'चाईल्ड लाईन'कडे आली होती.
Latur Crime
Latur Crime Saam Tv

लातूर : लग्न म्हटलं तर दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं. आपला मुलगा अथवा मुलीचं लग्न धुमधडाक्यात लागावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. मात्र लातूरमध्ये पार पडलेल्या एका विवाहामुळे नवरदेव आणि नवरीच्या आई वडिलांवर पश्चातापाची वेळ आली आहे. अवघ्या १५ वर्षांची नवरी अन् १७ वर्षाच्या नवरदेव असा बालविवाह नुकताच चाकूर तालुक्यातील घरणी येथे पाहूणे-रावळ्यांच्या उपस्थितीत पार पडला. घटनेची माहिती मिळताच लग्नसोहळ्यातच दाखल झालेल्या चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या पथकाने दोन्ही बाजुच्या तब्बल सहा जणांविरुध्द चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. (Latur Latest Crime News)

Latur Crime
मोठी बातमी! सिद्धू मुसेवालाला मारणारे दोन शूटर्स पुण्यातले; फोटोवरून पटली ओळख

दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी (३ मे) चाकूर तालुक्यातील घरणी येथे एक बालविवाह होत असल्याची तक्रार 'चाईल्ड लाईन'कडे आली होती. या तक्रारिच्या आधारे जिल्हा महिला बालकल्याण विभागाचे सामाजिक कार्यकर्ते अमर शिवाजी लव्हारे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे, चाईल्ड लाईनचे बापु सूर्यवंशी, भाग्यश्री शिदोरे यांचे पथक चाकूर पोलिसांसह घरणी येथे दुपारी १२.३० वाजता पोचले असता, तेथील १५ वर्षांची मुलगी आणि १७ वर्षाच्या मुलाचा विवाह घरणी ते आंबुलगा रोडवर असलेल्या महादेव मंदिरात होत असल्याची त्यांना माहिती मिळाली.

Latur Crime
Corona Update in India: देशात कोरोनाचा आलेख वाढताच; पाहा ताजी आकडेवारी

या माहितीच्या आधारे हे पथक घटनास्थळी पोचले असता या दोघांचाही विवाह पार पडला होता. यावेळी दोन्ही बाजुकडून नातेवाईकांची लग्नाला उपस्थिती होती. या संदर्भातची खात्री पटताच अमर लव्हारे यांनी चाकूर पोलिसांत सोमनाथ मारोती कसबे, मिनाबाई सोमनाथ कसबे, अनूसयाबाई अशोक शिंदे, अजय यादव कसबे, गुंडेराव शिंदे, ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (सर्व रा. घरणी ता. चाकूर) या नवरी व नवरदेव दोन्हीकडील नातेवाईकांच्या विरोधात बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा असतानाही हा बालविवाह लावून दिल्या प्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे चाकूर पोलिसांत बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com