पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम विषयी असणारे समज व गैरसमज जाणून घ्या

पीसीओएस हा आजार स्त्रियांमधील अनेक आजारांपैकी सामान्य आजार आहे.
Misconceptions about PCOS
Misconceptions about PCOSब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा मासिक पाळीचा भाग आहे. मासिक पाळीचा कालावधी हा २८ दिवसांचा असतो कधीतरी हे दिवस वाढले जातात. मासिक पाळीच्या तक्रारी आपल्यापैकी बऱ्याच जणींना आहेत.

हे देखील पहा-

पीसीओएस हा आजार स्त्रियांमधील अनेक आजारांपैकी सामान्य आजार आहे. हा आजार बदलेली जीवनशैली, मानसिक आणि शारीरिक ताण व अनुवांशिक कारणामुळे हा त्रास आपल्याला होऊ शकतो. पीसीओएस या आजारावर आपण औषधोपचार, योग्य आहार, नियमित योगासने किंवा व्यायम करुन त्यावर मात मिळवू शकतो. पीसीओएस झालेल्या महिलांना या आजाराविषयी माहिती नसते त्यामुळे त्यांच्यात अनेक समज- गैरसमज निर्माण होतात ते कोणते हे जाणून घ्या.

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम झाल्यानंतर आपल्या शरीरात बदल कसे होतात

१. आपल्यापैकी बऱ्याच स्त्रीयांना असे वाटते की, आपल्याला पीसीओएस झाल्यास आपण गर्भवती होऊ शकत नाही. असंतुलित हार्मोन्समुळे अंडाशयात निर्माण होणाऱ्या क्षमतेमुळे गर्भधारणेत अडचणी येतात. परंतु पीसीओएसमुळे वंध्यत्व येत नाही. यासाठी आपण डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घेऊ शकतो.

Misconceptions about PCOS
अनियमित मासिक पाळीची समस्या रोखण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा

२. आपल्याला पीसीओएस झाल्यास चेहऱ्यावर, हनुवटीवर आणि शरीराच्या इतर भागावर असामान्य केस (Hair) येऊन त्याची वाढ होऊ लागते. पीसीओएसमुळे शरीरात एंड्रोजनची पातळी वाढून असामान्य केस वाढू लागतात. प्रत्येक स्त्रीसाठी याची लक्षणे वेगवेगळी असतात.

३. अनियमित मासिक पाळीची कारणे वेगवेगळी असतात. गर्भाशयातील फायब्रॉइड्स, आहार, थायरॉईड, जास्त व्यायाम, आहार आदीचा ताळमेळ चुकला की मासिक पाळीचे त्रास उद्भवू लागतात. अनियमित मासिक हे पीसीओएसच्या लक्षणांपैकी एक आहे. यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

४. पीसीओएसच्या त्रासासाठी अनेक औषधे व उपचार आहेत. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नये. मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा पीसीओएसचा त्रास जाणवत असल्यास काही योगासने देखील आपण करु शकतो त्यामुळे काही प्रमाणात आराम मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com