Pregnancy Diet Chart : गरोदरपणातील या आहारांविषयी असणारे समज व गैरसमज जाणून घ्या

महिलांसाठी गर्भधारणेचा काळ जितका त्रासदायक असतो तितकाच तो सुंदरही असतो.
Diet chart for pregnant women, Health tips for pregnant women, diet plan for pregnant women,
Diet chart for pregnant women, Health tips for pregnant women, diet plan for pregnant women,ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महिलांसाठी गर्भधारणेचा काळ जितका त्रासदायक असतो तितकाच तो सुंदरही असतो. त्या अवस्थेत स्त्रिला स्वत:च्या आरोग्यासोबत पोटात असणाऱ्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे असते. (Pregnancy Diet Chart in Marathi)

हे देखील पहा -

आपल्या घरातील वृध्द किंवा जाणकार सदस्य अशावेळी आपली काळजी घेत असतात. अशा अवस्थेत कोणते पदार्थ खावेत व कोणते खाऊ नये असे आपल्याला वारंवार सांगितले जाते. गरोदरपणात खाद्यपदार्थाच्या बाबतीत अनेक समज व गैरसमज आहे. डॉक्टर आपल्याला काही पदार्थ खाण्याचे सल्ले देते तर आपल्या घरातील आजी किंवा आई ते पदार्थ खाण्यास आपल्याला नकार देतात त्यामुळे आपली संभ्रम अवस्था निर्माण होते. अशावेळी कोणाचा सल्ला घ्यावा? कोणते पदार्थ खावे किंवा कोणते पदार्थ खाऊ नये यामध्ये आपली गोची होते. यापैकी बरेच स्त्रिया ह्या डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करतात तर काही आपल्या कुटुंबाचे ऐकतात. वयोवृध्द गटातील काही महिला या पौराणिक गोष्टींमुळे आपल्याला खाण्यापिण्याच्या बाबतीत सतत टोकत असतात त्यामुळे आपली सतत चिडचिड होते.

Diet chart for pregnant women, Health tips for pregnant women, diet plan for pregnant women,
गरोदर असणाऱ्या महिलांनी पहिल्या ते नवव्या महिन्यापर्यंत या पदार्थांचा आहारात समावेश करा

गरोदरपणात (Pregnant) महिलांच्या अवस्थेत अनेक प्रकारचे बदल होतात. कधी सतत चिडचिड होते तर कधी सतत काही तरी खावे असे त्यांना वाटू लागते. परंतु काही पदार्थ हे गरम असतात त्यामुळे बाळाला हानी पोहोचू शकते, थंड पदार्थ खाल्ल्यानंतर बाळाला सर्दी होईल असे अनेक कारण सांगितल्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या पदार्थावर आळा घातला जातो. आहारातील समज व गैरसमजाविषयी जाणून घेऊया.

१. गरोदरपणात अधिक कॅलरीजचे सेवन करावे असे सांगतले जाते. परंतु, डॉक्टरांच्या मते गरोदरपणाच्या पहिल्या १६ ते २० आठवड्यापर्यंत साधे अन्न खाल्ले पाहिजे. २० आठवड्यांनंतरच बाळाला अधिक कॅलरीजची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, गर्भधारणेच्या सुरुवातीला जबरदस्तीने जास्त कॅलरी घेऊ नये.

Diet chart for pregnant women, Health tips for pregnant women, diet plan for pregnant women,
गरोदरपणात सिल बंद असलेल्या ज्यूसचे सेवन का करू नये ? जाणून घ्या त्यामागचे सत्य

२. गरोदर स्त्रिया (Womens) या काळाच सीफूड खाऊ शकतात की, नाही हा प्रश्न पडतो कारण मासे किंवा इतर पदार्थ हे अधिक उष्ण असतात त्यामुळे बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो. परंतु तज्ज्ञांच्या मते, जास्त उष्ण असणाऱ्या माश्यांचे सेवन करणे टाळावे. यामुळे बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशावेळी आपल्यासमोर सॅल्मन फिशचा पर्याय आहे. तसेच गरोदरपणात कच्चे सीफूड खाणे टाळायला हवे.

३. गरोदरपणात महिला अधिक चहा किंवा कॉफीचे सेवन करतात त्यावेळी त्यांना घरातले ते पिण्यास मनाई करतात. काही घरांमध्ये असे म्हटले जाते की चहा-कॉफी प्यायल्याने मूल काळवंडते तर काही घरांमध्ये असे म्हटले जाते की त्यात कॅफिन आढळते, त्यामुळे ९ महिने चहा आणि कॉफीचे सेवन करू नये. परंतु, तज्ञांच्या मते, गरोदरपणात चहा आणि कॉफीचे सेवन करू शकतो. पण त्याचे जास्त सेवन केल्याने नुकसान होऊ शकते.

४. गरोदरपणात अननस, आंबा किंवा ड्रायफ्रुट्ससारखे अधिक उष्ण पदार्थ खाल्ल्याने गर्भपात होतो असे सांगितले जाते परंतु, हे साफ चुकीचे आहे. गरोदरपणात सुक्या मेव्याचे सेवन करू शकतो. अधिक प्रमाणात सेवन केल्याने इतर अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com