आई इतकाच बाबा कसा महत्त्वाचा आहे हे जाणून घ्या

बदलत्या जीवनशैलीनुसार पालन पोषणात आजकाल हा नवीन ट्रेंड दिसून येत आहे.
आई इतकाच बाबा कसा महत्त्वाचा आहे हे जाणून घ्या
Father's Day special 2022ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बाब म्हटलं की, मुलांना त्यांच्याविषयी भिती वाटू लागते. त्याच्या प्रेमाच्या, आदराची जागा ही भितीने घेतली आहे.

हे देखील पहा -

मुलांचे खाणे पिणे, त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणे, त्यांच्यासाठी खरेदी करणे, त्यांच्या शाळा प्रवेशाविषयी चौकशी करणे, मुला मुलींच्या पालक सभेला जाणे या आणि अशा कितीतरी गोष्टींमध्ये आईचा वाटा अधिक असतो. बाबा फक्त पैसे देण्यासाठी असतात. घरात त्यांचा प्रेमापेक्षा धाकच अधिक असे चित्र अनेक घरांमधून आजही दिसून येते. आपणही वडील म्हणून असेच वागतो का हे जाणून घ्या.

१. बदलत्या जीवनशैलीनुसार पालन पोषणात आजकाल हा नवीन ट्रेंड दिसून येत आहे. ज्यामध्ये काही घरांमध्ये बाबा अगदी आईप्रमाणे मुला-मुलींच्या खाण्यापिण्याची काळजी घेतात. काही घरांमध्ये आई कामासाठी बाहेर जाते तर बाबा घरातून ऑफिसचे (Office) काम करत असतात. अशा वेळी आईपेक्षा बाबाच (Father) किचन सांभाळतात. एखाद्या आईप्रमाणेच आपल्या मुला मुलींना सकस आणि पोषक आहार कसा मिळेल याकडे लक्ष देतात.

Father's Day special 2022
फादर्स डे का साजरा केला जातो ? त्याच्या सुरुवात कधीपासून झाली

२. मुलांसोबत वडिलांसारखं न वागता त्यांच्याशी खूप मजा मस्ती करणारे बाबाही आजकल पाहायला मिळतात. अशाने मुलांशी मैत्री करायला देखील सोपे जाते. काही वेळा आईपेक्षा बाबा मुला मुलींना जास्त आवडतात, ते त्यांच्या जवळ आपल्या मनातील सर्व काही बोलतात. त्यामुळे आपल्या स्वभावात बदल करा.

३. मुलांच्या काही गोष्टीत बाबा हे गैरहजर असतात. बाबा घरी आल्यानंतर मुलांनी शांत बसायचे, गोंधळ करायचा नाही. ते बोलतील तसे ऐकायचे त्यामुळे बाबाचा धाक घरात कायम असतो अशामुळे मुले दुरावतात.

४. आजकाल 'सिंगल फादर' आपल्याला अधिक पाहायला मिळतात. पत्नीचा आकस्मिक मृत्यू झाला असेल किंवा पती पत्नीचा घटस्फोट होऊन मुलांची कस्टडी वडिलांकडे आली तर किंवा एखाद्या पुरुषाने लग्न न करता मूल दत्तक घेतले असेल, तर अशा वेळी हे सिंगल फादर मुलांची जबाबदारी आनंदाने पूर्ण करताना दिसत आहे.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com