Life Lesson : सोन्याला शोधाल तर, आयुष्याची माती होईल ! काळजाला भिडणारा व्हिडिओ पाहा!

प्रत्येक वेळा अडचणी आल्यानंतर आपण त्यात चांगले व वाईट शोधू लागतो. मग ते नाते असो किंवा आपल्या आयुष्यातील कोणताही प्रसंग.
Life lesson
Life lesson Saam Tv

Life Lesson : अनेक वेळा आपल्या आयुष्यात इतक्या अडचणी येतात की, आपण त्या परिस्थिती पुढे हरले जातो. त्यावेळी काय चांगले काय वाईट हे कळण्याइतपत आपले मन व डोके गोंधळले असते.

बऱ्याच वेळा हृदयाची शक्ती व मनाचा संकल्प जेव्हा एखाद्या कामासाठी लागतो तेव्हा कार्य हे उत्तम रितीने होते. प्रत्येक वेळा अडचणी आल्यानंतर आपण त्यात चांगले व वाईट शोधू लागतो. मग ते नाते असो किंवा आपल्या आयुष्यातील कोणताही प्रसंग.

कोणत्याही परिस्थितीत आपल्या चांगल्या गोष्टी शोधता यायला हव्या असे, गौर गोपाल दास यांचे म्हणणे आहे. चांगल्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित केले तर आपले संबंध, आपले काम चांगले होते.

वाईट गोष्टींना डावलून नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न केला किंवा त्यावेळी आपल्यासोबत वाईट काय झाले याचा विचार न करता पुढे गेलो तर आयुष्यात अपयशांना सामोरे जाण्याची क्षमता आपल्यात आपोआप निर्माण होईल. त्यासाठी आपण चांगल्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

कृपया लक्षात ठेवा की चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करताना आपल्याला वाईटाकडे दुर्लक्ष करण्याची गरज नाही.

१. इतरांमधील वाईट गोष्ट लहान आणि क्षुल्लक असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. जर त्यामुळे आपले मन व डोके स्थिर नसेल तर अशावेळी ओम इग्नोराय नमः या मंत्राचा सराव करा. यांने मनात उठलेली खळबळ शांत होईल.

२. जर कोणतेही नाते टोकाला पोहोचले असेल किंवा ते दुरुस्त करण्याइतपत देखील त्या नात्यात कोणतीच गरजेचे नसेल. तेव्हा ते नाते (Relation) दोघांसाठी हानिकारक असू शकते. अशावेळी त्या नात्यात समन्वय करुन त्याला सामोरे जाण्याचा मार्ग शोधा.

३. कोणत्याही कारणास्तव वाईट किंवा गंभीरपणे नाते दुरुस्त करण्याऐवजी त्या नात्यातून वेळीच बाहेर पडा. पुढे जाण्याचा प्रयत्न करा. या चुकीच्या किंवा मनाला न पटणाऱ्या गोष्टीमुळे आपली शांतता खराब होऊ शकते.

४. तसेच या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलो तर आपल्या आयुष्याची व वेळेची माती होण्यास वेळ (Time) लागणार नाही !

Edited By- Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com