Live In Relationship : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणांनी 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

आजकाल लिव्ह इन रिलेशनशिपचा खूप ट्रेंड आहे.
Live In Relationship
Live In RelationshipSaam Tv

Live In Relationship : हल्लीच्या तरुणांना लग्नासारख्या प्रथेमध्ये स्वत:ला बांधून घेणे आवडत नाही. त्यासाठी आवडणाऱ्या व्यक्तीला लग्नाशिवाय सोबत ठेवणे ते सोयीस्कर समजू लागतात. आजकाल लिव्ह इन रिलेशनशिपचा खूप ट्रेंड आहे. लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लोक लिव्ह-इनमध्ये राहणे पसंत करत आहेत, याशिवाय काही लोक आपले प्रेमाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी लिव्ह-इनचा अवलंब करतात

अनेकदा अशी नाती तुटतात देखील यामागे अनेक कारणे असू शकतात. अशा नात्यात एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे भांडणे होऊ लागतात. अशा परिस्थितीत प्रकरण लग्नापर्यंत पोहोचण्याआधीच हे नाते तुटते. तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल तर या खास गोष्टी लक्षात ठेवा. अशावेळी तुम्ही तुमचे नाते कसे सांभाळू शकता हे जाणून घ्या.

Live In Relationship
Couple Tips : नवऱ्याच्या 'या' 4 चुकांमुळे बायकोला सहन करावा लागतो त्रास, तुम्ही देखील अस काही करत नाही ना !

1. नात्यात परिसीमा ठेवा

जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Relationship) रहात असाल तर एकमेकांच्या वैयक्तिक जागेत प्रवेश करू नका कारण एखाद्या वेळी प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी थोडा वेळ हवा असतो. अशा परिस्थितीत जोडीदाराला वेळ द्या, पण विनाकारण त्यांच्या आयुष्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नका.

2. एकमेकांना मदत करा

लिव्ह इन रिलेशनशिप पार्टनरने (Partner) घरातील कामात मदत करावी. सर्व कामांचा बोजा जोडीदारावर टाकू नका, शक्य असल्यास घरातील कामे आपापसात वाटून घ्या. यामुळे तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवता येईल आणि घरातील कामेही होतील

3. घर खर्चाची विभागणी

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सर्वात मोठा नियम हा आहे की तुम्ही कोणत्याही एका जोडीदारावर संपूर्ण घराचा खर्च टाकू नये. अशा परिस्थितीत जर तुम्ही दोघे काम करत असाल तर घराचा खर्च विभागून घेऊ शकता.

4. एकत्र वेळ घालवा

अनेकदा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असूनही पार्टनर एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना लंच किंवा डिनरसाठी एकटेच बसावे लागते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगले नाते निर्माण करायचे असेल तर त्यांच्यासोबत स्वयंपाकात मदत करण्यासोबतच एकत्र बसून जेवण करा आणि एकमेकांना तुमच्या दिवसभराच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा.

Live In Relationship
Couple Tips : लैंगिक संबंधासाठी 'या' आहेत हॉट पोझिशन, नातं होणार आणखी बेस्ट...

5. प्रोटेक्शन वापरा

अनेकदा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना पार्टनर एकमेकांच्या जवळ येतात तर हे नाते कधी जिव्हाळ्याचे बनते कळत नाही. अशा परिस्थितीत, लग्नापूर्वी गर्भधारणा होण्याचा धोका टाळण्यासाठी प्रोटेक्शनचा वापर करा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com