7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी ! DA बाबत आली मोठी बातमी; महागाई भत्ता 46...

DA Hike : केंद्रीय कर्मचारी जुलैची वाट पाहत आहेत. जुलैमध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. यामुळे त्याच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
7th Pay Commission
7th Pay CommissionSaam Tv

Good News For central employees : केंद्रीय कर्मचारी जुलैची वाट पाहत आहेत. जुलैमध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. यामुळे त्याच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पण, त्याचा आनंद एवढ्यापुरताच मर्यादित नाही. वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने जानेवारी ते जून 2023 पर्यंत डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला होता.

महागाई भत्त्यात वाढ झाल्याने इतर भत्त्यांमध्येही वाढ होणार आहे. जुलै 2023 पासून त्याचा थेट फायदा (Benefits) कर्मचाऱ्यांपासून निवृत्तीवेतनधारकांना (Pensioners) मिळणार आहे. यात प्रवास भत्ता (Travel Allowance) आणि शहर भत्ता (City Allowance) यांचाही समावेश आहे. याशिवाय केंद्रीय कर्मचार्‍यांना प्रोविडेंट फंड आणि ग्रॅच्युइटीमध्येही मोठी प्राप्ती होणार आहे.

7th Pay Commission
7th Pay Commission: गुड न्यूज! केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढणार, जाणून घ्या किती होणार पगार?

प्रवास भत्ता (Travel Allowance) -

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई ( Inflation) भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. म्हणजे 4 टक्क्यांनी वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या DAचा परिणाम TA अर्थात प्रवास भत्त्यावरही होईल. जेव्हा DA 46 टक्के असेल तेव्हा TA देखील थेट वाढेल.

प्रोविडेंट फंडची व्याप्ती वाढेल -

तज्ज्ञांच्या मते, केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही सेवानिवृत्तीचे फायदे मिळत आहेत. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे त्यांचा पगार वाढणार असून मासिक प्रोविडेंट फंड आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे. हे दोन्ही घटक बेसिक + DA वरून मोजले जातात. डीए वाढला तर पीएफ, ग्रॅच्युइटीही वाढेल. यामध्ये मासिक पीएफ, ग्रॅच्युइटी योगदान वाढेल.

7th Pay Commission
7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता वाढणार, थकबाकीही मिळणार

कर्मचार्‍यांच्या पेन्शनस् वाढणार -

केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या पेन्शनधारकांच्या महागाई सवलत (Dearness Relief ) देखील वाढेल. हे फक्त DA शी जोडलेले आहे. निवृत्तीनंतर, ते महागाई सवलत म्हणून उपलब्ध आहे. DR देखील 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. त्याचे मासिक पेन्शन वाढणार आहे.

जुलैमध्ये महागाई भत्त्यात प्रचंड वाढ होणार आहे

डीएमध्ये पुढील वाढ केवळ जुलै 2023 पासून लागू होईल. म्हणजे जून 2023 पर्यंतचा महागाई भत्ता जुलैपासून लागू होईल. डीएमध्ये 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यासह ते 46 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com