
सध्या वातावरणात खूप बदल होत आहेत. सततच्या प्रदुषणामुळे लोकांना खूप त्रास होत आहे. प्रदुषण कमी करण्यासाठी अनेक क्षेत्रांतून प्रयत्न होत आहे. यावर एक उपाय म्हणून इलेक्ट्रिक कार, बाईक बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. महिंद्रा लवकरच इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. याच इलेक्ट्रिक कारची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
महिंद्रा ही वाहन उत्पादन कंपन्यांमधील नावाजलेली कंपनी आहे. या कंपनीने नेहमीच ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करत नवीनवीन वाहने बाजारात आणले आहे. कंपनी आता इलेक्ट्रिक कारच्या शर्यतीत बाजारात उतरली आहे. महिंद्राची बाजारात एक इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहे. तर आता कंपनी आणखी ४ इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.
महिंद्राची सध्या XUV 400 ही एकमेव इलेक्ट्रिक कार बाजारात उपलब्ध आहे. तर महिंद्राने १५ ऑगस्टला इलेक्ट्रिक थारचे कनसेप्ट मॉडेल लाँच केले असून ही कार लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. याशिवाय, कार बॉलेरो, स्कॉर्पिओ आणि XUV.e8 यादेखील इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये लाँच होणार आहे.
महिंद्रा XUV.e8
महिंद्रा कंपनी सध्या इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनाकडे जास्त लक्ष देत आहे. महिंद्रा आपल्याच Xuv 700, XUV.e8 या कार इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये लाँच करणार आहे. या ईव्हीचे कनसेप्ट मॉडेल कंपनीने यूकेतील ऑटो फेस्टमध्ये ऑगस्ट २०२२ मध्ये सादर केले होते. या कारमध्ये 800kWhची बॅटरी मिळेल. तर 230 ते 350bhp पॉवर देणारे इंजिन मिळू शकते. कंपनीची ही कार डिसेंबरमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. या कारची किंमत 30 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
महिंद्रा Thar.e
महिंद्राचे थार हे सर्वोत्तम वाहन आहे. महिंद्राने त्यांच्या नवीन ईव्ही थारचे कनसेप्ट मॉडेल ग्लोबल फ्युरस्केप इव्हेंटमध्ये सादर केले. या मॉडेलचे नाव Thar.e असणार आहे. महिंद्राने या कारला 5 फ्युचरिस्टिक लूक दिला आहे. मार्च २०२६पर्यंत ही कार लाँच होऊ शकते. या थारची किंमत 20-25 लाखांपर्यंत असू शकते.
Scorpio.e आणि Bolero.e
महिंद्राने १५ ऑगस्टला स्कॉर्पिओ आणि बोलेरोचे ईलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याची घोषणा केली आहे. Scorpio.e ही कार 2026 पर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. Thar.e प्रमाणेच Scorpio.e आणि Bolero.e कार सध्याच्या पेट्रोल आणि डिझेल मॉडेलपेक्षा वेगळ्या असू शकतात. अशी अपेक्षा आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.