Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीला ही 3 कामं चुकूनही करु नये...

यंदा पंचांगांमधील वेळेतील फरकामुळे मकर संक्रांती 14 आणि 15 जानेवारी या दोन्ही दिवशी साजरी केली जाणार आहे.
Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीला ही 3 कामं चुकूनही करु नये...
Makar SankrantiSaam Tv

मुंबई : 14 जानेवारीला सूर्य धनू राशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल. सूर्याचा हा राशी बदल मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो. मात्र, यंदा पंचांगांमधील वेळेतील फरकामुळे मकर संक्रांती 14 आणि 15 जानेवारी या दोन्ही दिवशी साजरी केली जाणार आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, तीळ-गुळाचे सेवन, खिचडी इत्यादी काही विशेष कार्य करण्याची परंपरा आहे. परंतु या दिवशी काही विशेष कार्य करण्यास मनाई आहे. ती कोणती हे जाणून घ्या (Makar Sankranti 2022 Do Not Do These 3 Things On This Day)

Makar Sankranti
Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीला ही कामं नक्की करा, सुख-समृद्धी लाभेल

मकर संक्रांतीच्या दिवशी ही कामं करु नका -

- मकर संक्रांती (Makar Sankranti) च्या दिवशी चुकूनही तामसिक अन्न (मांसाहारी, लसूण-कांदा) आणि दारुचे सेवन करु नका. मकर संक्रांतीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो, या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. या दिवशी मद्य आणि मांसाहाराचे सेवन करणे तुम्हाला पापाचा भाग बनवेल आणि कष्ट देईल, अशी मान्यता आहे.

- मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याचे खूप महत्त्व आहे. विशेषतः तीळ-गूळ, खिचडी यांचे दान करावे. घरासमोर भिकारी आला तर चुकूनही त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. असे केल्याने धनहानी होते. शक्य असल्यास तुमच्या कुंडलीनुसार दान करा. यामुळे ग्रह शुभ परिणाम देऊ लागतील. काळे तीळ आणि गूळ दान केल्याने शनिदेव (Shanidev) आणि सूर्यदेवाची कृपा प्राप्त होईल.

Makar Sankranti
Makar Sankranti: साजरा करताना आरोग्याची काळजी घ्या, नायलॉन मांजा टाळा- छगन भुजबळ

- मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान (Donation) केल्याशिवाय अन्न ग्रहण करु नये. स्नानासाठी पाण्यात पवित्र नद्यांचे पाणी मिसळा.

(टीप - येथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसाधारण धार्मिक मान्यता आणि माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. याचं कुठलंही वैज्ञानिक कारण नाही. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांना सल्ला घ्या...)

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com