Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीला घरात 'ही' गोष्ट ठेवा, वर्षभर लक्ष्मीची कृपा लाभेल

मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाची कृपा मिळविण्यासाठी खूप खास मानला जातो.
Makar Sankranti
Makar SankrantiSaam Tv

मुंबई : मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाची कृपा मिळविण्यासाठी खूप खास मानला जातो. परंतु, यादिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचीही पूजा करावी. यामुळे वर्षभर कामांमध्ये यश मिळते आणि भरपूर पैसाही मिळतो. आज 14 जानेवारीला लोक मकर संक्रांत साजरी करत आहेत. सुदैवाने आज देवी लक्ष्मीचाही दिवस आहे. अशा परिस्थितीत आज केलेली एक सोपी युक्ती तुम्हाला वर्षभर अमाप पैसा मिळवून देईल (Makar Sankranti 2022 keep kaundiyan on this place in house for prosperity today).

Makar Sankranti
Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीला ही कामं नक्की करा, सुख-समृद्धी लाभेल

या ठिकाणी कवड्या ठेवा

मकर संक्रांती (Makar Sankranti) च्या दिवशी 14 स्वच्छ कवडी घ्या आणि त्यांना केशरमिश्रित दुधाने अभिषेक घाला. नंतर गंगाजलने धुवून स्वच्छ ताटात ठेवा. यानंतर देवी महालक्ष्मीसमोर एक तुपाचा आणि दुसरा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. महालक्ष्मीच्या डाव्या बाजूला तिळाच्या तेलाचा दिवा आणि उजवीकडे तुपाचा दिवा लावावा. यानंतर देवी लक्ष्मी (Lakshami) चे ध्यान करुन 14 दिवस ओम संक्रांत्याय नमः या मंत्राचा जप करा.

नंतर रात्री 12 वाजता कवड्या उचलून वेगवेगळ्या स्वच्छ ठिकाणी ठेवा. याने देवी लक्ष्मी सदैव घरात वास करेल आणि घरावर देवीची कृपा राहील.

Makar Sankranti
Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीला ही 3 कामं चुकूनही करु नये...

हे उपायही करुन पाहा -

आज काळे तीळ आणि गुळाचे लाडू दान करा.

सुख आणि सौभाग्य वाढीसाठी 14 विवाहितांना सौभाग्याची वस्तू वाण म्हणून द्या.

(टीप - येथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसाधारण धार्मिक मान्यता आणि माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. याचं कुठलंही वैज्ञानिक कारण नाही. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांना सल्ला घ्या...)

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com