
Makar Sankranti wishes in Marathi : नववर्षातला पहिला सण हा मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो. या सणानिमित्त अनेक ठिकाणी आपल्याला पतंग, मांजा, तीळाचे लाडू, पुरण पोळी व इतर अनेक गोष्टी पाहायला व चाखायला मिळतात.
प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या रीतीनुसार त्याचे विशेष महत्त्व व परंपरा आहेत. आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेली मकर संक्रांती (Makar Sankranti) हा उत्सव (Celebrate) जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो. हा उत्सव वेगवेगळ्या नावाने भारतातील (India) विविध प्रांतात साजरा केला जातो. आपल्या प्रियजनांना या सणाच्या (Festival) शुभेच्छा याप्रकारे पाठवा
1. तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
2. हलव्याचे दागिने, काळी साडी
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला !
3. एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला !
4. तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास आणि तुमच्या परिवारास..
SHUBH SANKRANTI!
5. कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या
मकरसंक्राती हार्दिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला
6. आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे.
तिळगुळ घ्या गोड बोला...!
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.