
Halwa Recipe Of Apple : ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. फळांमध्ये उपलब्ध असणारे विटामिन आणि इतर पोषक तत्त्वांमुळे चेहऱ्यावरती तेज येते. यासोबतच अनेक प्रकारच्या आजारांपासून सुटकारा मिळतो.
लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी फळांचे (Fruits) सेवन केले पाहिजे. या सगळ्या फळांमध्ये सफरचंद अतिशय पौष्टिक मानला जातो. दररोज नाश्तामध्ये एक सफरचंद खाल्ल्याने अनेक रोग दूर निघून जातात. सोबतच तुमची इम्युनिटी मजबूत राहते. खरंतर रोज सफरचंद खाणे बोरिंग वाटू शकते.
लहान मुले बऱ्याचदा फळे खास करून सफरचंद (Apple) खाण्यासाठी नकार देतात. त्याचबरोबर वृद्ध व्यक्तींना सफरचंद चाऊन खाण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. सोबतच बाजारातून आणलेले सफरचंद कोणी खाल्ले नाही की ठेवून ठेवून त्यामधील ताजेपण निघून जाते.
तुमच्या घरात सुद्धा सफरचंद आहेत आणि ते कोणी खात नाही आहे तर, सफरचंदाची एक चविष्ट डिश बनवून सर्व्ह करा. आज आम्ही तुम्हाला सफरचंदाचा हलवा बनवायला शिकवणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सफरचंदाचा हलवा कसा बनवायचा.
सफरचंदाचा हलवा बनवण्यासाठीची सामग्री -
पाच सफरचंद, दोन मोठे चमचे तूप, पाच चमचे साखर, एक कप फुल क्रीम दूध, दोन चमचे नारळाची पावडर, अर्धा चमचा दालचिनी पावडर, ड्रायफ्रूट्स आणि वेलचीपूड.
सफरचंदाचा हलवा बनवण्याची पद्धत -
सफरचंदाचा चविष्ट हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी सफरचंदाची साल काढून घ्या.
त्यानंतर सफरचंदाचे छोटे छोटे तुकडे कापून घ्या.
त्यानंतर एका कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. नंतर यामध्ये बादाम टाकून सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्या.
त्यानंतर कढईमध्ये कापून ठेवलेले सफरचंदाचे तुकडे टाकून मध्यम गॅसवर पाच मिनिटांसाठी शिजवा.
त्यानंतर कढईमध्ये दूध टाकून कमी गॅसवर पंधरा मिनिटे शिजवा. यादरम्यान मिश्रण सतत ढवळत रहा. सोबतच दुधामध्ये सफरचंदाचे तुकडे स्मॅश करा.
त्यानंतर साखर टाका. थोड्या वेळानंतर दालचिनी पावडर, नारळाची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाका.
जेव्हा मिश्रण चांगलं घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा. एका वाटीमध्ये हलवा वाढा आणि वरून बदामाचे रोस्टेड काप घालून गार्निश करा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.