Anjeer Kheer Recipe : मधुमेहींसाठी बनवा शुगर फ्री डेजर्ट, अंजीरच्या खीरीचे आरोग्याला अनेक फायदे

Recipe : ड्रायफ्रूटच्या सेवनाने आपले आरोग्य सुदृढ राहते. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.
Anjeer Kheer Recipe
Anjeer Kheer RecipeSaam Tv

Recipe Of Anjeer Kheer : ड्रायफ्रूटच्या सेवनाने आपले आरोग्य सुदृढ राहते. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. तुम्हाला अंजीर पासून होणारे फायदे माहित आहेत का. अंजीर कच्चे आणि सुके दोन्ही पद्धतीने खाल्ले जाऊ शकतात.

अंजीरमध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्ब आणि फायबर यांसारखे गुणधर्म उपलब्ध असतात. याच्या सेवनाने तुम्ही अनेक समस्यांपासून सुटकारा मिळवू शकता. अंजीरच्या सेवनाने तुम्ही कफ कंट्रोलमध्ये ठेवू शकता. सोबतच वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी अंजीर अत्यंत फायदेशीर असते. अंजीर हे एका औषधासारखे असते.

अनेक डायबिटीस झालेल्या व्यक्तींना गोड खावेसे वाटते. परंतु गोड खाणे त्यांच्या आरोग्यास (Health) हानिकारक असते. खरंतर अंजीरमध्ये नैसर्गिक साखर असते. त्यामुळे डायबिटीजच्या रोग्यांनी अंजीरचे सेवन केल्याने त्यांना कोणताही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. त्याचबरोबर तुम्ही अंजीरची खीर बनवून खाऊ शकता.

Anjeer Kheer Recipe
Pudina Kachori Recipe : नाश्त्यात बनवा चविष्ट अशी पुदिना कचोरी, पाहा रेसिपी

अंजीरची खीर बनवण्याची साहित्य -

एक लिटर दूध, दहा ते पंधरा अंजीर, दोन टेबलस्पून बदाम, आठ ते दहा भिजवलेले बादाम, ते दहा भिजवलेला पिस्ता, एक टेबलस्पून केसर धागे, एक कप कंडेन्सड मिल्क, चार ते पाच वेलची, दोन टेबलस्पून बादाम पेस्ट, चवीनुसार साखर, दोन टीस्पून तूप

Anjeer Kheer Recipe
Pudina Chutney Recipe : पोटाची जळजळ थांबवण्यासाठी पुदिन्याची चटणी ठरेल फायदेशीर, पाहा रेसीपी

अंजीरची खीर रेसीपी -

  • अंजीरची खीर बनवण्यासाठी सर्वात आधी अंजीर पाण्याने स्वच्छ धुऊन कापून घ्या.

  • आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून अंजीरच्या तुकड्यांना कमी गॅसवर भाजून घ्या.

  • आता एका मोठ्या भांड्यामध्ये दूध घेऊन त्यामध्ये अंजीरचे तुकडे टाका.

  • आता हे अंजीर दुधामध्ये चार ते पाच तास भिजत ठेवा. मिक्सरमध्ये बादाम, वेलची चांगल्या पद्धतीने पीसून घ्या.

  • त्यानंतर दुधात भिजवलेल्या अंजीरला चांगल्या पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

  • आता कढईमध्ये उरलेले दूध उकळी येईपर्यंत गरम करा. दुधाला उकळी आल्यानंतर अंजीरची पेस्ट दुधामध्ये टाका.

  • त्यानंतर कंडेस्ड मिल्क टाकून चार ते पाच मिनिटे खीर शिजवा. नंतर चवीनुसार साखर टाकून चांगली उकळी येऊद्या.

  • खीरमध्ये साखर चांगल्या प्रकारे वितळेपर्यंत गॅस चालू ठेवा. तुमची अंजीरची खीर तयार आहे. ड्रायफ्रुट्सने गार्निश करून गरमागरम खीर सर्व करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com